गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अहमद पटेल हरणार ?

गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अहमद पटेल हरणार ?

गुजरात विधानसभेतून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदानास सुरुवात झाली आहे....मात्र निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचं बोललं जात असल्याने काँग्रेसचे अहमद पटेल यांची सीट धोक्यात आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे आणखी दोन आमदार फुटल्याची चर्चा आहे. खरंच असं झालं असेल तर मग अहमद पटेल यांचा पराभव जवळपास निश्चित आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 8 ऑगस्ट : गुजरात विधानसभेतून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदानास सुरुवात झाली आहे....मात्र निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचं बोललं जात असल्याने काँग्रेसचे अहमद पटेल यांची सीट धोक्यात आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे आणखी दोन आमदार फुटल्याची चर्चा आहे. खरंच असं झालं असेल तर मग अहमद पटेल यांचा पराभव जवळपास निश्चित आहे. गुजराजमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 45 मतं मिळणं आवश्यक आहेत. काँग्रेसकडे 44 आमदार असून राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदारांना अहमद पटेल यांना मतदान केल्याचा दावा केलाय.

काँग्रेसचे बंडखोर नेते शंकरसिंह वाघेला यांनी तर मतदानाच्या दिवशीच अहमद पटेल यांच्या पराभवाचं भाकित वर्तवलंय. 'मी पटेल यांना मत दिलं नाही,' असंही त्यांनी म्हटलंय. भाजपकडून या निवडणुकीत अमित शहा, स्मृती ईराणी आणि बलवंत सिंह राजपूत रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल पाचव्यांदा नशीब आजमावताहेत. मतांच्या कोट्यानुसार भाजपच्या 2 दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. खरी लढत ही तिसऱ्या जागेसाठी आहे. भाजपनं बलवंत सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी दिली त्यांनी नुकतेच काँग्रेस सोडले आहे. कदाचित त्यामुळेच काँग्रेसची मतं फुटण्याचे चान्सेस अधिक आहेत.

गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे अमित शहा आणि काँग्रेसचे अहमद पटेल प्रथमच आमनेसामने आलेत. अमित शहा यांनीही आपले जुने हिशेब चुकते करण्यासाठी अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी एकदम 'टाईट फिल्डिंग' लावलीय. त्यामुळे या अशक्य गोष्टी मॅनेज करण्यात एक्सपर्ट असणाऱ्या दोन बड्या नेत्यांमध्ये कोण जिंकतंय, याकडे राजकीय पंडितांचं लक्षं लागलंय. या निवडणुकीत अहमद पटेल हरले तर काँग्रेस पक्षासाठी ही मोठी नामुष्की असणार आहे.

First published: August 8, 2017, 2:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading