Elec-widget

2002 गुजरात दंगल : बिल्किस बानो प्रकरणात 17 वर्षानंतर न्यायालयाचा मोठा निर्णय

2002 गुजरात दंगल : बिल्किस बानो प्रकरणात 17 वर्षानंतर न्यायालयाचा मोठा निर्णय

बिल्किस बानो प्रकरणात 17 वर्षानंतर मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या जातीय दंगलीनं सारा देश हादरून गेला. गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत शेकडो लोकांचे बळी गेले. दरम्यान गुजरात दंगलीमध्ये घडलेल्या बिल्किस बानो प्रकरणानं सारा देश सुन्न झाला. याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार गुजरात सरकारनं पीडित बिल्किस बानोला नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, बिल्किस बानोला सरकारी नोकरी आणि राहण्याची व्यवस्था देखील सरकारी नियमाप्रमाणे करण्याचे आदेश न्यायालयानं दिलं आहे. तब्बल 17 वर्षानंतर बिल्किस बानो प्रकरणात न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.Loading...


काय आहे बिल्किस बानो प्रकरण

2002मध्ये गुजरातमध्ये दंगल जातीय दंगल उसळली होती. यावेळी अहमदाबादपासून 250 किमी अंतरावर असलेल्या रंधीकपूर गावात 3 मार्च 2002 रोजी बल्किस बानोच्या परिवारावर जमावानं हल्ला केला. यावेळी बल्किसच्या 3 वर्षाच्या मुलासह सात जणांची हत्या जमावानं केली. यावर हा जमाव थांबला नाही तर 5 महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्किस बानोवर सामुहिक बलात्कार देखील करण्यात आला. घटनेवेळी बिल्किसचं वय होतं अवघं 19 वर्षे ! यामध्ये बिल्किसच्या परिवारातील 6 जण बचावले.

त्यानंतर 4 मार्च 2002 रोजी पंचमहलमधील लिमखेडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर 19 एप्रिल 2004 रोजी सीबीआयनं चार्जशीट दाखल केली. दरम्यान, बिल्किसच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयानं सारं प्रकरण 3 ऑगस्ट 2004 रोजी मुंबईमध्ये ट्रान्सफर केलं होतं. सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये 11 जणांना दोषी ठरवण्यात आलं.

अखेर 17 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय दिला असून बिल्किस बानोला नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, बिल्किस बानोला सरकारी नोकरी आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देखील दिले आहेत.


VIDEO: शिवाजी महाराजांच्या धोरणानुसार सध्या रयतेचं राज्य आहे? पुरंदरे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...