Home /News /national /

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन

शुक्रवारी श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

    अहमदाबाद, 29 ऑक्टोबर : कोरोना काळात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी केशुभाई पटेल यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांना शुक्रवारी श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात निकटवर्तीय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केशुभाई यांनी दोन वेळा गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. केशुभाई पटेल यांनी 1995मध्ये प्रथम गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी 1998 ते 2001 या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांनी राज्यात सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या. केशुभाई पटेल यांनी 2012 साली भाजप सोडून आपला ‘गुजरात परिवर्तन पार्टी’ हा नवा पक्ष स्थापन केला. हे वाचा-देवेंद्र फडणवीस यांनी केलेला घोटाळ्याचा आरोप राजेश टोपेंनी फेटाळला, दिलं उत्तर 2012च्या विधानसभा निवडणुकीत ते विसावदार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते पण नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2014 रोजी त्यांनी राजीनामा दिला होता. पटेल यांच्या निधनाबद्दल सूरतचे भाजप खासदार दर्शन जारदोश यांनी लिहिले की, 'गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख झालं. त्यांचं कौशल्य, पक्ष निष्ठा आणि गुजरातच्या राजकारणात त्यांचं असलेलं स्थान खूप मोलाचं होतं.' पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Pm modi

    पुढील बातम्या