News18 Lokmat

गुजरात सरकारचं शेतीकडे दुर्लक्ष-पाटीदार शेतकरी

ग्रामीण भागातले शेती करणारे पाटीदार येत्या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. तरीही सरकारबद्दलचा रोष त्यांच्या मनात कायम आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 5, 2017 11:41 AM IST

गुजरात सरकारचं शेतीकडे दुर्लक्ष-पाटीदार शेतकरी

05  डिसेंबर : सरकारने शेतीकडे दुर्लक्ष केलंय असं मत पाटीदार समाजाच्या शेतकऱ्यांचं आहे.    गुजरातमध्ये पाटीदार समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्यावरुन ग्रामीण आणि शहरी किंवा उद्योजक विरुद्ध शेतकरी असा फरक स्पष्ट दिसतोय. ग्रामीण भागातले शेती करणारे पाटीदार येत्या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. तरीही सरकारबद्दलचा रोष त्यांच्या मनात कायम आहे.

गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन सुरु झाल्यानंतर शहरांमध्ये पाटीदार समाजानं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं ते तर आपण सगळ्यांनीच पाहिलं. पाटीदार समाज जितका उद्योगधंद्यामध्ये आहे तितकाच तो ग्रामीण भागात शेती व्यवसायातदेखील आहे. राज्य सरकारनं सौराष्ट्रात शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्यानेच आम्हाला रस्त्यावर उतरुन पाटीदार आरक्षणाची मागणी करावी लागतेय असं जामनगर जिल्ह्यातील पीपडटोडा गावातील पाटीदार शेतकऱ्यांचं मत आहे.

पाटीदार समाजातील जे लोक उद्योगपती आहेत ते फक्त सरकारच्या बाजूनं आहेत पण आमच्यासारखे कष्टकरी सरकारच्या विरोधात आहेत असंही शेतकऱ्यांचं मत आहे. त्यामुळे पाटीदार आंदोलनातला शहरी आणि ग्रामीण असा फरकही स्पष्ट होतोय. आमच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे  हार्दिकच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं हे शेतकरी सांगत आहेत.

पाटीदार समाजातील शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख समस्या 

- राज्य सरकारनं पूर्वीच्या अनेक कृषी योजना बंद केल्याने किंवा बदलल्याचा शेतकऱ्यांना फटका

Loading...

- शेतीला पुरेसं पाणी नाही

- नवे चेक डॅम, जुन्यांची दुरुस्ती नाही

- कमी वीजपुरवठा

- शेतीमालाला भाव नाही

- ग्रामीण भागात चांगल्या शाळा नाहीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2017 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...