दंड कसा करायचा? हेल्मेट नाही म्हणून अडवलं पण पोलिसांनाच पडला प्रश्न

दंड कसा करायचा? हेल्मेट नाही म्हणून अडवलं पण पोलिसांनाच पडला प्रश्न

तरुणाने म्हटलं की, मी कायद्याचा आदर राखतो आणि नियमही पाळतो. मात्र मी हेल्मेट घालू शकत नाही.

  • Share this:

अहमदाबाद, 17 सप्टेंबर : सध्या देशभरात वाहन धारकांमध्ये नव्या वाहतूक नियमांची मोठी दहशत आहे. नियम मोडायला नको रे बाबा असंच वाहन धारक म्हणताना दिसत आहेत. ट्राफिक पोलिसांचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर येत आहे. आता आणखी एक गोंधळ वाढवणारी घटना गुजरातमध्ये घडली आहे. ट्राफीक पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या झाकीर मेमन नावाच्या एका वाहन चालकाला अडवले. त्याला दंडही केला पण नंतर झाकीरचा प्रॉब्लेम ऐकून पोलिसांनाही प्रश्न पडला की याला दंड कसा करायचा.

झाकीरच्या डोक्याचा आकार मोठा असल्यानं त्याला हेल्मेट मिळत नाही. कोणत्याही बाजारात इतक्या मोठ्या आकाराचं हेल्मेट उपलब्ध नसल्यानं तो काहीच करू शकत नाही. झाकीर म्हणतो की, मी कायदाचा आदर राखतो आणि नियमही पाळतो. हेल्मेटसाठी मी अनेक दुकानांमध्ये गेलो पण ते मिळालं नाही. गाडीची आवश्यक ती कागदपत्रं जवळ बाळगतो पण हेल्मेट नसतं. मी काहीच करू शकत नाही. मी त्याबद्दल पोलिसांनाही सांगितलं.

एक फळांचं दुकान चालवणाऱ्या झाकीरचं डोकं मोठं आहे. त्याबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही चिंता असते. त्याला नेहमीच सोबत जास्त पैसे बाळगावे लागतात ज्यावेळी तो बाइकवरून जातो.

याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत राठवा यांनी सांगितलं की, झाकीरची समस्या खरी आहे. त्याच्याकडे कोणताच पर्याय नाही त्यामुळं दंडही करता येत नाही. हेल्मेट वगळता तो सर्व नियमांचे पालन कतो.

एक सप्टेंबरपासून नवा मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. नव्या कायद्यानुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. काही राज्य सरकारकडून याला विरोधही करण्यात आला आहे.

Loading...

भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग? BCCI नाही तर 'हा' टॉप कॉप लावणार छडा!

CCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 08:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...