गर्लफ्रेंडला न भेटल्यामुळे अस्वस्थ झाला तरुण, मुलीच्या वेषात घरात शिरला पण...

गर्लफ्रेंडला न भेटल्यामुळे अस्वस्थ झाला तरुण, मुलीच्या वेषात घरात शिरला पण...

डप्यांना एकमेकांना भेटणं मुश्किल झालं आहे. त्यामुळं सध्या व्हिडीओ किंवा चॅटशिवाय काही पर्याय नाही.

  • Share this:

सुरत, 27 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यामुळं जोडप्यांना एकमेकांना भेटणं कठिण झालं आहे. त्यामुळं सध्या व्हिडीओ किंवा चॅटशिवाय काही पर्याय नाही. यातच गुजरातच्या वलसाडमध्ये लॉकडाऊनमुळे एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटू शकला नाही, त्यामुळं त्यानं जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही. या तरूणानं आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलीचा वेष परिधान केला, पण त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि तो पकडला गेला.

या 19 वर्षीय मुलानं सांगितलं की, पोलीस महिलांची आणि मुलींची चौकशी करत नाही. त्यामुळं लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी हा मार्ग काढला. रात्री तीनच्या सुमारास तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला बाहेर गेला. रात्री गस्त घालताना पोलिसांना त्याला पाहिलं. तेव्हा मुलगा पंजाबी ड्रेसमध्ये आपला चेहरा झाकुन फिरत होता. पोलिसांनी मुलाला थांबवलं आणि त्याचं भांड फुटलं.

वाचा-'बर्थ डे'चं अनोखं 'गिफ्ट'! 14 वर्षीय मुलगी वाढदिवशीच झाली कोरोनामुक्त...

चेहऱ्यावरून ओढणी काढली आणि...

पोलिसांनी तरुणाला विचारल्यानंतर तो काही बोलू शकला नाही. त्यांनतर पोलिसांनी ओढणी काढली तेव्हा या मुलाची पोलखोल झाली. ओढणी काढल्यानंतर हा मुलगा असल्याचं पाहून पोलीस कर्मचारीही चक्रावले. पोलिसांनी सांगितले की, तरुणानं ओढणीनं तोंड झाकलं होतं. पोलीसांना टाळण्यासाठी त्यानं असा गेटअप केल्याचं सांगितलं. दरम्यान या घटनेनंतर या तरूणाविरुद्ध महामारी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचा-धक्कादायक परिणाम! कोरोनाची पहिली लस दिलेला तरुण आधी झाला बेशुद्ध मग...

First published: May 27, 2020, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading