मराठी बातम्या /बातम्या /देश /

भयंकर! Vaginal Infection झालं म्हणून पतीनं दिला घटस्फोट

भयंकर! Vaginal Infection झालं म्हणून पतीनं दिला घटस्फोट

तिहेरी तलाकसाठी अजब कारण देऊन पत्नीसोबत काडीमोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तिहेरी तलाकसाठी अजब कारण देऊन पत्नीसोबत काडीमोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तिहेरी तलाकसाठी अजब कारण देऊन पत्नीसोबत काडीमोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    अहमदाबाद, 07 नोव्हेंबर : तिहेरी तलाकसाठी अजब कारण देऊन पत्नीसोबत काडीमोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हजायनल इन्फेक्शन (Vaginal Infection )असल्याचं सांगत पतीनं थेट घटस्फोट मागितल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर पीडित महिलेनं स्थानिक पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली आणि न्याय मागितला आहे. या पीडित महिलेचा पती एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कला शाखेतून पदवी घेतलेल्या शबाना सईद या महिलेचं सिद्दीकी सईद या व्यक्तीसोबत 2 मे 2019 मध्ये लग्न झालं. कुटुंबीयांनी आणलेल्या स्थळासोबत लग्न केल्यानंतर वर्षभरातच पतीने तमाशे करण्यास सुरुवात केली. छोट्या-छोट्या गोष्टींवरून ओरडणं आणि भांडणं करणं नातेवाईकांना शिवीगाळ करण्याचे प्रकरण सुरूच होते. जुलैमध्ये एका वैद्यकीय चाचणीदरम्यान ती गर्भवती राहिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे वाचा-नशीब काढलं राव! राहण्यासाठी छप्पर नसलेल्या सेल्समनला लागली 7 कोटींची लॉटरी घरातल्या कामांना जुंपल्यामुळे शबानाला आपल्या आरोग्याची नीट काळजी घेण्यासाठीही वेळ मिळत नव्हता. यामधूनच तिला व्हजायनल इन्फेक्शनचा त्रास झाला. पतीला याबाबत सांगूनही वारंवार दुर्लक्ष करत होता. त्यानंतर शबानाला उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि तापाने फणफणली. त्यावेळी शबानाच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी तिला यासंदर्भात माहिती दिली. या घटनेनंतर शबानाचा पती तिला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी देखील आला नाही. ना त्याने कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 27 ऑक्टोबरला थेट पती घरी आला आणि त्याने घटस्फोट दिला. यावेळी कुटुंबीयांना शिवीगाळ करत तमाशा देखील केला. या प्रकरणी शबानाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या