मराठी बातम्या /बातम्या /देश /

'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी 2 लाखांचा खर्च; वाचा गुजरातच्या तरुणाचा अनोखा 'कार'नामा

'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी 2 लाखांचा खर्च; वाचा गुजरातच्या तरुणाचा अनोखा 'कार'नामा

फोटो क्रेडिट - ट्विटर

फोटो क्रेडिट - ट्विटर

हर घर तिरंगा या अभियानाच्या जनजागृतीसाठी गुजरातमधील एका तरुणाने सुरत ते दिल्ली असा सलग दोन दिवस प्रवास केला. सिद्धार्थ असे त्याचे नाव आहे.

  नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे आव्हान पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे हर घर तिरंगा ही मोहीम प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी राबविली जात आहे. याच हर घर तिरंगा मोहिमेच्या निमित्ताने एक बातमी समोर आले आहे. हर घर तिरंगा मोहिमेच्या थीमवर गुजरातमधील एका तरुणाने त्याच्या कारला नवा लूक दिला आहे. त्यासाठी या तरुणाने २ लाखांचा खर्च केला आहे. सुरत ते दिल्ली दोन दिवस प्रवास - यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “यावर्षी आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, हर घर तिरंगा आंदोलनाला बळ देऊया. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकावा. याच अभियानाच्या जनजागृतीसाठी गुजरातमधील एका तरुणाने सुरत ते दिल्ली असा सलग दोन दिवस प्रवास केला. सिद्धार्थ असे त्याचे नाव आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हेही वाचा - Pune : झंडा उंचा रहे हमारा : दिव्यांग व्यक्तीनं 75 पायऱ्या हातानं चढून फडकवला तिरंगा, VIDEO

  राज ठाकरेंच्या 'शिवतिर्था'वर फडकला तिरंगा - 

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमावर स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. या अमृत महोत्सवाचा भाग म्हणूनच हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेत राज ठाकरेदेखील सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारच्या या मोहिमेला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत शिवतिर्थावर तिरंगा फडकवला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीत लावलेला तिरंगा आणि त्यांच्या नातवाचा एक अनोखा फोटो कॅमेऱ्यात टिपला आहे.

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Gujrat

  पुढील बातम्या