आता 'नाणार' जाणार गुजरातला? राजकारणात जाणार प्रकल्पाचा बळी

आता 'नाणार' जाणार गुजरातला? राजकारणात जाणार प्रकल्पाचा बळी

  • Share this:

मुंबई 20 फेब्रुवारी : युतीच्या राजकारणात अखेर कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा बळी जाणार हे आता निश्चित आहे. नाणार प्रकल्प होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी युतीच्या पत्रकार परिषदेत दिलं होतं. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर तातडीने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आणि त्यात सेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प रद्द करण्याचं आश्वासन दिलं.

'नाणार'हा देशातला सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असणार आहे. सौदी अरेबीयाची सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी 'अराम्को' हा प्रकल्प उभारणार होती. यात तीन लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाख जणांना रोजगार देण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रात त्याला विरोध होत असल्यानं हा प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे.

नाणार प्रकल्पावरून महाराष्ट्रात रणकंदन माजलं होतं. कोकणात या प्रकल्पाला विरोध होत असल्याने शिवसेनेने त्यात उडी घेतली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोकण दौऱ्यात हा प्रकल्प रद्द होणारच असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याच्या अटीवरच सेनेनं युतीसाठी होकार दिला. देशातल्या सर्वाधिक विदेशी गुंतवणूक होणाऱ्या प्रकल्पांपैकी नाणार हा एक प्रकल्प होता.

विरोधामुळे आता हा प्रकल्प नाणारवरून दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात विरोध होत असतानाच गुजरातने अराम्को कंपनीला गुजरातमध्ये प्रकल्प उभारा अशी ऑफर दिली होती. पश्चिम बंगालमध्ये 'नॅनो'प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अवघ्या 24 तासात नॅनोला सगळ्या परवानग्या दिल्या होत्या. त्यामुळे आताही गुजरात हा प्रकल्प येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील  नाणार प्रकल्पाला  असाच विरोध होत राहिला तर नाणारचा प्रकल्प अखेर गुजरातला जाईल असा सूचक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आधीच दिला होता. कोकणातील राजकीय नेते नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत.

सरकारमधीलच शिवसेना, तसंच  नारायण राणे हे या  नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे.पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचं, मासेमारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे.    या  विरोधाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा दिला होता.

अराम्को कंपनी भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प टाकू इच्छिते. म्हणूनच राज्य सरकारने त्यांना नाणारचा प्रस्तावही दिला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने दुजोरा दिला आहे.   पण या प्रकल्पाला असाच विरोध वाढत कायम राहिला तर हा 3 लाख कोटींचा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो, तसंही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधीत कंपनीला आमंत्रित केलं आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

'नाणार' येणे ही भाग्याची गोष्ट'

First published: February 20, 2019, 6:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading