वडिलांनी मुलीला लग्नात दिली 2200 पुस्तकांची भेट, कुराण, बायबल आणि पुराणंही

वडिलांनी मुलीला लग्नात दिली 2200 पुस्तकांची भेट, कुराण, बायबल आणि पुराणंही

आता काळ बदलत चालला आहे आणि काळासोबत विचारही. मुलीच्या लग्नात पूर्वी हुंडा द्यावा लागत असे पण गुजरातमधल्या राजकोटमध्ये वडिलांनी मुलीला एक लग्नात एक मौल्यवान भेट दिली.

  • Share this:

अहमदाबाद, 14 फेब्रुवारी : आता काळ बदलत चालला आहे आणि काळासोबत विचारही. मुलीच्या लग्नात पूर्वी हुंडा द्यावा लागत असे पण गुजरातमधल्या राजकोटमध्ये वडिलांनी मुलीला एक लग्नात एक मौल्यवान भेट दिली. मुलीच्या लग्नात दागिने, वाहनं, कपडे अशी खरेदी केली जाते पण याच्या शिवाय या बापाने आपल्या मुलीला 2200 पुस्तकं (Books)भेट दिली. हरदेव सिंह जाडेजा शिक्षक आहेत. त्यांची मुलगी किन्नरीलाही पुस्तकांचं वेड आहे. त्यांच्याकडे 500 पुस्तकाचं वाचनालयही (Library) आहे.

किन्नरीचं लग्न जेव्हा वडोदरामधला इंजिनिअर पूर्वजीत सिंह याच्याशी ठरलं तेव्हा तिने वडिलांना सांगितलं, माझ्या लग्नात हुंड्याऐवजी पुस्तकं दिली तर मला खूपच आनंद होईल.मुलीची ही मागणी पूर्ण करण्याचं वडिलांनी ठरवलं.

धार्मिक, इंग्रजी आणि हिंदी पुस्तकंही

ही पुस्तकं कशा पद्धतीने दिली जावीत हे ठरवणंही सोपं नव्हतं. हरदेव सिंह यांनी सुरुवातीला आपल्या मुलीच्या आवडत्या पुस्तकांची यादी तयार केली. त्यानंतर त्यांनी जवळजवळ 6 महिने फक्त पुस्तकांसाठी दिल्ली, काशी आणि बंगळुरूसह अनेक शहरांचे दौरे केले आणि पुस्तकं गोळा केली. यामध्ये महर्षि वेद व्यास यांच्यासारख्या ऋषीतुल्य लेखकांसह मान्यवर लेखकांची पुस्तकं यात आहेत. यामध्ये कुराण, बायबलसह 18 पुराणंही आहेत.

(हेही वाचा : 'व्हॅलेंटाइन डे' : रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं)_

पुस्तकप्रेमाचा वसा

एकीकडे त्यांनी हुंड्याच्या प्रथेला छेद दिला तर दुसरीकडे वाचनाचा वसाही जपला. हरदेव सिंह यांनी आपल्या मुलीला लग्नात एवढा साहित्यिक वारसा दिलाय की तिला ही शिदोरी आयुष्यभर पुरू शकते. त्यांचा आदर्श घेऊन पुस्तकप्रेमाची आणि वाचनाची ही प्रेमाची चळवळ आपणही जपायला हवी.

===========================================================================================

First published: February 14, 2020, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading