S M L
Football World Cup 2018

Gujarat Elections Result 2017 LIVE : गुजरात निवडणुकीचे अपडेट्स

सकाळी ८ वाजता सरकारी कर्मचाऱ्यांनी पोस्टानं पाठवलेल्या मतपत्रिकांची मोजणीनं मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर ८:३० वाजेपासून ईव्हीएमची मतमोजणी होईल.

Sachin Salve | Updated On: Dec 18, 2017 12:54 PM IST

Gujarat Elections Result 2017 LIVE : गुजरात निवडणुकीचे अपडेट्स

Highlight

Dec 18, 2017

 • 16:56(IST)

  गुजरातमध्ये जिथे झाला जीएसटीला विरोध, तिथेच भाजपने जिंकल्यात 16 पैकी 15 जागा !

 • 16:24(IST)
 • 16:24(IST)

  आम्ही 150 जागांचा दावा केला होता, पण काँग्रेसने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला, त्यामुळे जागा वाढल्या नाही, असं असतं तर जागेचा योग्य अंदाज सांगितला असता - अमित शहा


    https://www.facebook.com/News18Lokmat/videos/1808615939148912/ #ElectionResults #ElectionsWithNews18

 • 16:22(IST)

  गुजरात निवडणुकीत काँग्रेसनं जातीवादाचं राजकारण केलं - अमित शहा    https://www.facebook.com/News18Lokmat/videos/1808615939148912/ …  


  #ElectionResults #ElectionsWithNews18                                                      

 • 16:10(IST)

  गुजरात आणि हिमाचलमधील जनतेचे आभार - अमित शहा
  https://www.facebook.com/News18Lokmat/videos/1808615939148912/


  #ElectionResults #ElectionsWithNews18

 • 16:09(IST)

  गुजरात आणि हिमाचलमधील जनतेचे आभार - अमित शहा
  https://www.facebook.com/News18Lokmat/videos/1808615939148912/


  #ElectionResults #ElectionsWithNews18

 • 14:42(IST)

  मोदींचा वारू राहुल गांधींनी रोखला-शशी थरूर 

  #Electionswithnews18 #gujaratelections2017live

 • 14:38(IST)

  नेहरू आणि गांधींपेक्षा मोदी मोठे झाले आहेत -संजय काकडे 

 • 14:34(IST)

  #Gujaratelections2017LIVE: गुजरातमधील विजयाबद्दल नागपूरमध्ये  विधिमंडळात भाजप आमदारांचा  जल्लोष 

 • 14:31(IST)

   #gujaratelections2017live: मोदी हिरो काकडे झिरो,  हे मान्य करतो-संजय काकडे

 • 14:27(IST)

    #gujaratelections2017LIVE: गुजरातमध्यील विजयानिमित्त नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

 • 14:25(IST)

  गुजरातमध्ये मतदानावर जीएसटी नोटबंदीचा परिणाम नाही

  ​#gujaratelections #gujaratverdict   

 • 14:25(IST)

  डोंबिवली - युवक काँग्रेस आणि महिला आघाडी तर्फे नागरिकांना पेढे आणि गाजर वाटप, गुजराथ निवडणुकीत काँग्रेस कांटे टक्कर दिली म्हणून वाटले पेढे, भाजप-सेनेनं काहीच केले नाही फक्त आश्वासन दिले म्हणून वाटली गाजरं

 • 14:23(IST)

  गुजरातमध्ये भाजपची शंभरी घसरली  

  ​ भाजप- 99 काँग्रेस-80 तर अपक्ष 3 जागांवर आघाडीवर

  #gujaratelections2017live #gujaratverdict  

 • 14:22(IST)

  गुजरातच्या निकालामुळे निराश नाही - राहुल गांधी

18 डिसेंबर: सगळ्या देशाचं लक्ष असलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येत्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजता सरकारी कर्मचाऱ्यांनी पोस्टानं पाठवलेल्या मतपत्रिकांची मोजणीनं मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर ८:३० वाजेपासून ईव्हीएमची मतमोजणी होईल.

गुजरातमध्ये एकूण ३७ ठिकाणी मतमोजणी केंद्र आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मतमोजणी केंद्रं असून अहमदाबादमध्ये ३, सुरत आणि आनंद प्रत्येकी २ मतमोजणी केंद्रं आहेत. या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यासाठी ४० हजार सुरक्षा जवानांची नियुक्ती निवडणूक आयोगानं केली आहे. तर मतमोजणीसाठी १० हजार जणांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी आणखी १० हजार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल्स असतील जिथे ईव्हीएमनं मतमोजणी करण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका बूथच्या VVPAT ची पडताळणी करण्यात येणार आहे. १८२ मतदारसंघासाठी प्रत्येकी एक अशी निरीक्षकांची नियुक्ती निवडणूक आयोगानं केली आहे. सगळी मतमोजणी वेबकास्ट करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईलसहीत कोणतंही ईलेकट्राॅनिक उपकरण नेण्यास मनाई आहे.

गुजरात निवडणूकीतील महत्त्वाच्या लढती

मतदारसंघ  - राजकोट पश्चिम

भाजप - विजय रुपानी

काॅंग्रेस - इंद्रनील राजगुरु

मतदारसंघ - वडगाम, बनसकांठा

अपक्ष (काॅंग्रेस पुरस्कृत) - जिग्नेश मेवानी

भाजप - विजय चक्रवर्ती

मतदारसंघ - राधनपूर

जिल्हा - पाटन

काॅंग्रेस - अल्पेश ठाकोर

भाजप - लाविनजी ठाकोर

मतदारसंघ - भावनगर

भाजप- जितू वागानी, प्रदेशाध्यक्ष , भाजप

काॅंग्रेस - शक्तिसिंह गोहिल

मतदारसंघ - धोराजी

- जिल्हा - राजकोट

- पाटीदार नेता ललित वायोसा काॅंग्रेसच्या तिकिटावर उमेदवार

भाजप - हरीलाल पटेल

मतदारसंघ - मणिनगर

जिल्हा - अहमदाबाद

- नरेंद्र मोदी याच जागेवरून २००२, २००७ आणि २०१२ साली निवडून गेले होते

- भाजप - सुरेश पटेल

काॅंग्रेस - श्वेता ब्रम्हभट

मतदारसंघ - नाराणपुरा

जिल्हा - अहमदाबाद

- २०१२ साली अमित शहा याच मतदारसंघातून निवडून गेले होते

- भाजप - कौशिक पटेल

- काॅंग्रेस - नितीन पटेल

मतदारसंघ - मेहसाना

भाजप - नितीन पटेल, उपमुख्यमंत्री

काॅंग्रेस - जीवाभाई पटेल

जीवाभाई पटेलांनी २००४ साली लोकसभा निवडणुकीत नितीन पटेल यांचा १४ हजार मतांनी पराभव केला होता

मतदारसंघ - पोरबंदर

काॅंग्रेस - अर्जुन मोढवाढीया, माजी गुजरात प्रदेशाध्यक्ष

भाजप - बाबू बोखारिया, मोदी सरकारमध्ये मंत्री

२०१२ मध्ये बोखारिया यांनी मोढवाढीया यांचा पराभव केला होता, त्यानंतर मोढवाढीया यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता

मतदारसंघ - कच्छ

काॅंग्रेस - शक्तीसिंह गोहिल

भाजप - ताराचंद छेडा

काॅंग्रेसचे उमेदवार गोहिल यांनी पक्षाचे नेते अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणूक विजयात महत्च्वाची भूमिका बजावली होती

२०१२ चा टप्पानिहाय निकाल 

पक्ष     टप्पा १    टप्पा २

भाजप    ६३         ५२

काॅंग्रेस    २२         ३९

इतर        ४          २

एकूण     ८९         ९३

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 09:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close