गुजरातमध्ये पाटीदार मतदारांनी मतदानाला फिरवली पाठ; नेते चिंतेत

गुजरातमध्ये पाटीदार मतदारांनी मतदानाला फिरवली पाठ; नेते चिंतेत

पाटीदारबहुल मतदारसंघात मतदानाची टक्केवारी १२ ते ६ टक्के इतकी घटली आहे

  • Share this:

17 डिसेंबर: यंदाच्या गुजरात विघानसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान झालं आहे. त्यातही आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेल्या पाटीदार समाजानेही मतदानाकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली आहे. याचा थेट परिणाम निकालावर होणार की नाही असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालाय.त्यामुळे पाटीदार नेते चिंतेत आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी यंदा २०१२ च्या तुलनेत ३.६१% मतदान कमी झालं आहे. 2017च्या मतदानाची टक्केवारी सांगतेय की, पहिल्या टप्प्यात ६६.७५ % तर दुसऱ्या टप्प्यात ६९.९८ % इतकं मतदान झालं आहे. तर एकूण ६८.४१ % मतदान झालं आहे. तर

२०१२ मध्ये ७२.०२ % मतदान झालं होतं.

या टक्केवारीत ग्रामीण शहरी असा फरकही आहे. ग्रामीण भागात मतदारसंघ आहेत ९८ तर ६९.९८ %  मतदान झालंय. शहरी भागात मतदारसंघ आहेत ३९ तर  ६५.२७ %.मतदान झालंय .तसंच, निमशहरी भागातील मतदान मतदारसंघ आहेत ४५ आणि  ६८.१ % मतदान झालं

याचाच अर्थ ग्रामीण भागात शहरांपेक्षा ५ % मतदान जास्त आहे. गेल्या निवडणुकीत ग्रामीण भागानं कॉँग्रेसला चांगला हात दिला होता. एक्झीट पोलचे आकडे भाजपच्या बाजूनं जात असले तरी हे मतदारसंघ आपल्याला तारतील असं काँग्रेसला वाटतंय. शिवाय गुजरातमध्ये ५७ टक्के मतदार शेतीशी संबंधित आहे. त्यावरही कॉँग्रेसची भिस्त आहे.

इतकंच नव्हे तर ज्या पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे गुजरातची निवडणूक गाजली त्या पाटीदारबहुल मतदारसंघात मतदानाची टक्केवारी १२ ते ६ टक्के इतकी घटली आहे. त्यामुळे या समाजाचा नेता हार्दिक पटेलचा प्रभाव खरंच या निवडणुकीत पडणार आहे की नाही या विषयीचा संभ्रम कायम आहे.

पाटीदारांच्या मनात भाजपबद्दल रोष आहे. तर दुसरीकडे काँग्रेसलाही त्यांना मत द्यायची इच्छा नसल्याचं दिसतंय.त्यामुळे पाटीदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे  अशी चर्चा आहे.

सोमवारी 18ला  या निवडणुकीचे निकाल लागणार आहे. ही निवडणूक यावेळला प्रचंड गाजली असल्यामुळे सगळ्या देशाचंच निकालाकडे लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 04:00 PM IST

ताज्या बातम्या