गांधीनगर, 14 नोव्हेंबर : भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत, तर निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबरला लागणार आहेत. या निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. गुजरात निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळेल आणि भुपेंद्र पटेल पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
'न्यूज 18 इंडिया'चा विशेष कार्यक्रम 'गुजरात अधिवेशन'मध्ये Network18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी आप आणि काँग्रेसविरुद्धच्या सामन्यावर भाष्य केलं.
'आम्ही रेकॉर्ड तोडण्याचं राजकारण करत नाही. 1990 पासून आजपर्यंत भाजप एकदाही निवडणूक हरलेली नाही. गुजरातच्या जनतेच्या आशिर्वादामुळे हे शक्य झालं. गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा 365 दिवसांपैकी 250 दिवस कर्फ्यू असायचा,' असा टोला अमित शाह यांनी लगावला.
संजय राऊतांना अटक आणि जामीन, ईडीच्या कारवाईवर पहिल्यांदाच बोलले अमित शाह
'वीज देणं म्हणजे रेवडी वाटणं नाही, पण वीज बील न देणं हे रेवडी देणं आहे. कुणाला घर देणं हे रेवडी वाटणं नाही, घर देणं म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनाचा स्तर वाढवणं आहे. आम्ही घराचा कर माफ करत नाही. आम्ही शौचालयं बनवतो, पण आम्ही शौचालयाचं रिपेअरिंग करत नाही. कोरोनानंतर स्लो डाऊन झालं, ज्याचा फटका गरिबाला बसून नये म्हणून रेशन दिलं. नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणं म्हणजे रेवडी वाटणं नसतं,' असं अमित शाह म्हणाले.
'केशूभाई पटेल, शंकरसिंग वाघेला, चिमणभाई पटेल यांनीही आपली पार्टी बनवली. गुजरातमध्ये कधीच तिसऱ्या पक्षाला मान्यता मिळाली नाही. डब्बे उघडू दे परिणाम स्पष्ट दिसेल,' असं म्हणत अमित शाह यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षण फ्री करू, अशी आश्वासनं दिली जातात, पण इकडे 1960 पासून प्राथमिक शिक्षण फ्री आहे, मग काय फ्री करणार तुम्ही? इकडे काय चाललं आहे, तेदेखील यांना माहिती नाही, असा टोला अमित शाह यांनी आप ला लगावला.
अयोध्येचं तिकीट काढून ठेवा! अमित शाहंनी सांगितला राम मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah