गुजरातमध्ये सत्ता भाजपची, चर्चा मात्र राहुल गांधींची !

काँग्रेसने जोरदार टक्कर देत यश मिळवलंय. त्यामुळे विजय भाजपचा झालाय पण चर्चा मात्र राहुल गांधींची सुरू आहे.

Sachin Salve | Updated On: Dec 18, 2017 05:25 PM IST

गुजरातमध्ये सत्ता भाजपची, चर्चा मात्र राहुल गांधींची !

18 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला गड कायम राखण्यात यश मिळवलंय. भाजपने बहुमताचा आकडा पार केलाय असून सत्ता कायम राखली आहे. पण सत्ता कायम राखताना भाजपची चांगलीच दमछाक झालीये. तर दुसरीकडे काँग्रेसने जोरदार टक्कर देत यश मिळवलंय. त्यामुळे विजय भाजपचा झालाय पण चर्चा मात्र राहुल गांधींची सुरू आहे.

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणुकीचे कल येण्यास सुरुवात झालीये. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिले कल हाती येईपर्यंत भाजपने आघाडी घेतली होती. पण काँग्रेसने भाजपला चांगलीच टक्कर दिली. अवघ्या 10 ते 9 जागांच्या फरकाने काँग्रेस भाजपपासून दूर होतं. वेळ अशी आली की अचानक काँग्रेसने आघाडी घेतली आणि भाजपला मागे टाकलं.

भाजपचे  विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानीही मागे पडले. त्यामुळे भाजप नेत्यांना चांगलीच धडकी भरली. गुजरात आपल्या हातातून जातं की काय ? असं वातावरण निर्माण झालं होतं. एवढंच काय याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला. शेअऱ बाजार सुरू झाल्यानंतर 650 अंकांनी घसरला. एवढंच काय तर जल्लोष साजरा करू नका असे आदेशही भाजपला कार्यकर्त्यांना द्यावे लागले होते.

पण काही वेळानंतर भाजपने आघाडी घेतली आणि भाजपच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला. शेअर बाजारही तातडीने सावरला.  भाजपला बहुमत तर मिळालं पण 99 जागांवर समाधान मानावं लागलं. निकाल आपल्या बाजूने लागल्याचे पाहुन पंतप्रधान मोदी यांनाही हायसं वाटलं. लोकसभेत पोहोचल्यानंतर हात उंचावून व्हिक्टरीचा साईन दिला.

भाजपचे अध्यक्ष  अमित शहा यांनी तर भाजपला 150 जागा मिळतील असा दावा केला होता. पण कसाबसा 100 चा आकडा ही गाठता आला नाही.  भाजपला मागील निवडणुकीत 115 जागा मिळाल्या होत्या पण यावेळी त्याहुन कमी जागांवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही पण त्यांनी मोदींच्या गडाला चांगलाच हादरा दिला. मागील 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला 61 जागा आल्या होत्या. यावेळी काँग्रेसला जवळपास 13 जागांची वाढ झाल्याचं दिसून येतंय. एवढंच नाहीतर यावेळी 3 लाख मतदारांनी नोटाचा पर्याय स्विकारल्याचं पुढे आलंय.

एकंदरीतच भाजपचा विजय जरी झाला असला तरी राहुल गांधी यांनी मैदान मारले आहे. राहुल गांधी यांच्या कारकिर्दीला गुजरात निवडणुकीने नवे वळण दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close