गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान

गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान

बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्यात, गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्यात, गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशसोबतच म्हणजेच 18 डिसेंबरलाच गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी होईल.

गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर करण्यास विलंब केल्याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर अखेर आज निवडणूक आयोगाने गुजराज इलेक्शनच्या तारखा जाहीर केल्यात. पुरस्थितीमुळे निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यास विलंब झाल्याचं आयोगाने स्पष्ट केलंय. गुजरातमध्ये गेल्या 20 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पण यावेळी प्रथमच मोदी हे इथले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार नाहीत. याउलट काँग्रेसच्या राहुल गांधींना गुजराती जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झालीय. मोदींनीही डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गेल्या दीड महिन्यात तब्बल 5 वेळा गुजरातचा दौरा केलाय. यावरून ही निवडणूक भाजपसाठी किती प्रतिष्ठेची बनलीय हे सहज स्पष्ट होतंय.

गुजरात विधानसभा निवडणूक 

2012चं पक्षीय बलाबल 

- भाजप - 120

- काँग्रेस - 43

- राष्ट्रवादी - 02

- जदयु - 01

- अपक्ष - 01

- रिक्त जागा - 15

गुजरातमधील जातीय समीकरण

पाटीदार 20%

मुस्लिम 9% दलित -7 %

पाटीदारमुस्लिम 29%

सवर्ण 20%

ओबीसी 30%

क्षत्रिय, दलित आदिवासी 21%

सवर्णओबीसीकेएचए 71%

गुजरात विधानसभा निवडणूक 

महत्वाचे मुद्दे कोणते ?

- पाटीदार आंदोलन

- जीएसटीची अंमलबजावणी

- बेरोजगारी

- नोटबंदी

- शिक्षण, आरोग्य सेवांचा अभाव

- भाजपवर घोडेबाजाराचा आरोप

- काँग्रेसकडे चेहरा नसल्याची टीका

First published: October 25, 2017, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading