गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम; भाजपच्या आघाडीनंतर सेन्सेक्स सावरला

आज गुजरातच्या निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात झाली. पहिल्या तासभर भाजप अनेक जागांवर आघाडीवर होतं. तेव्हा शेअर मार्केट स्थिर होतं. पण 9.30च्या सुमारास काँग्रेसने भाजपला मागे टाकलं.त्याचा परिणाम लगेच शेअर मार्केटवर झाला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2017 11:14 AM IST

गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम; भाजपच्या आघाडीनंतर सेन्सेक्स सावरला

18 डिसेंबर:  आज सकाळी गुजरातच्या निवडणुकांचे  निकाल येण्यास सुरूवात झाली तेव्हा काही काळ भाजप पिछाडीवर तर काँग्रेस आघाडीवर गेला. पण काही वेळाने भाजप पुन्हा आघाडीवर आल्यावर शेअर मार्केट सावरून सेन्सेक्स 900 अंकांनी वधारल्याची बाब समोर आली.

आज  गुजरातच्या निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात झाली. पहिल्या तासभर भाजप अनेक जागांवर आघाडीवर होतं. तेव्हा शेअर मार्केट स्थिर होतं. पण 9.30च्या सुमारास काँग्रेसने भाजपला मागे टाकलं.त्याचा परिणाम लगेच शेअर मार्केटवर झाला.सेन्सेक्स तब्बल 800 अंकांनी तर निफ्टी 250 अंकांनी घसरला. पण नंतर अर्ध्या तासात पुन्हा  भाजपने मुसंडी मारली आणि आघाडीमध्ये  100 जागांचा  आकडा पार केला. पुन्हा शेअर बाजारात हालचाल झाली आणि शेअर मार्केट सावरलं.

गुजरात हे व्यापाऱ्यांचं राज्य आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांचा शेअर मार्केटमध्ये मोठा वाटा आहे. त्यामुळे गुजरातच्या निकालांचा  परिणाम शेअर मार्केटवर होतो. एकंदर शेअर मार्केटमधील गुंतवणूक करणाऱ्यांचा  भाजपच्या आर्थिक धोरणांवर  विश्वास  आहे असं म्हणण्यास हरत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...