गुजरात निवडणूक 2017 : 'त्या' 6 ठिकाणी फेरमतदानाला सुरुवात

गुजरात निवडणूक 2017 : 'त्या' 6 ठिकाणी फेरमतदानाला सुरुवात

विरमगाम आणि सावली विधानसभा या क्षेत्रात दोन-दोन तर वडगाम आणि दस्करोई या विधानसभा क्षेत्रात एक-एक केंद्रावर फेरमतदानाला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

17 डिसेंबर : गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 6 ठिकाणी पुन्हा मतदान करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहिलं.

विरमगाम आणि सावली विधानसभा या क्षेत्रात दोन-दोन तर वडगाम आणि दस्करोई या विधानसभा क्षेत्रात एक-एक केंद्रावर फेरमतदानाला सुरुवात झाली आहे.

 

गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ब्ल्युटूथद्वारे छेडछाड करण्यात आल्याच्या आरोपानंतर गुजरातमध्ये 6 ठिकाणी पुन्हा मतदान होणार आहे. आज रविवारी 17 डिसेंबरला 10 मतदान केंद्रावर व्हीव्हीपैटद्वारे मतदान होणार आहे. गुजरातमधील वडगाम, विरमगाम, दस्करोई आणि सावली इथं फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने 10 मतदान केंद्रावर व्हीव्हीपेटद्वारे इथं मतदान होईल असं स्पष्ट केलंय.

ज्या मतदान केंद्रावर मतदान होतंय त्या भागात विसनगर, बेचारजी, मोडासा, वीजलपुर, वात्वा, जमालपुर-खड़िया, सावली आणि सनखेडा आहे. 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्पात जेव्हा मतदान झाले तेव्हा या मतदान केंद्रावर ब्ल्यटूथद्वारे ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याची तक्रार आली होती. परंतु, याबद्दल कोणताही पुरावा मिळाला नाही.

गुजरात निवडणुकीच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलंय. सोमवारी 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेशसाठी मतमोजणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 12:10 PM IST

ताज्या बातम्या