S M L

ब्ल्युटूथद्वारे ईव्हीएमसोबत छेडछाडीच्या आरोपांमुळे गुजरातमध्ये 6 ठिकाणी रविवारी फेरमतदान

गुजरातमधील वडगाम, विरमगाम, दस्करोई आणि सावली इथं फेरमतदान होणार आहे.

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2017 11:43 PM IST

ब्ल्युटूथद्वारे ईव्हीएमसोबत छेडछाडीच्या आरोपांमुळे गुजरातमध्ये 6 ठिकाणी रविवारी फेरमतदान

16 डिसेंबर : गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ब्ल्युटूथद्वारे छेडछाड करण्यात आल्याच्या आरोपानंतर गुजरातमध्ये 6 ठिकाणी पुन्हा मतदान होणार आहे. उद्या रविवारी 17 डिसेंबरला 10 मतदान केंद्रावर व्हीव्हीपैटद्वारे मतदान होणार आहे.

गुजरातमधील वडगाम, विरमगाम, दस्करोई आणि सावली इथं फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने 10 मतदान केंद्रावर व्हीव्हीपेटद्वारे इथं मतदान होईल असं स्पष्ट केलंय.

ज्या मतदान केंद्रावर मतदान होतंय त्या भागात विसनगर, बेचारजी, मोडासा, वीजलपुर, वात्वा, जमालपुर-खड़िया, सावली आणि सनखेडा आहे. 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्पात जेव्हा मतदान झाले तेव्हा या मतदान केंद्रावर ब्ल्यटूथद्वारे ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याची तक्रार आली होती. परंतु, याबद्दल कोणताही पुरावा मिळाला नाही.

गुजरात निवडणुकीच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलंय. सोमवारी 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेशसाठी मतमोजणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 11:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close