जीवघेण्या हल्ल्यातून गायीने मालकाची अशी केली सुटका, VIDEO पाहून बसेल धक्का!

जीवघेण्या हल्ल्यातून गायीने मालकाची अशी केली सुटका, VIDEO पाहून बसेल धक्का!

जान साईला मदतीसाठी हाका मारत होता. आपला मालक संकटात आहे हे दिसताच गाय धावतच त्याच्याकडे आली. एवढच नाही तर त्याच्या हाताला बांधलेली दोरीही तिने काढण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

अहमदाबाद 15 नोव्हेंबर:  माणूस आणि प्राण्यांच्या प्रेमाच्या कहाण्या काही नव्या नाहीत. रक्ताच्या नात्यापेक्षाही मुके प्राणी हे जास्त प्रेम लावत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. या नात्यात सगळ्यात जास्त चर्चा होते ती फक्त कुत्रा आणि माणसाच्या नात्यांची. मात्र शेतकऱ्यांना कुत्रा जसा प्रिय असतो तसेच गाय आणि बैलही तेवढेच प्रिय असतात. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video ) झाला आहे. आपला मालक संकटात आहे हे दिसताच एक गाय कळपातून धावत आली आणि तिने त्याला संकटातून सोडवलं असा हा व्हिडिओ असून गाय आणि तिच्या मालकाचं नातं त्यातून दिसून येतं.

गुजरातमधल्या कच्छमध्ये जान मानद हा तरुण दुग्धपालनाचा व्यवसाय करतो. जानकडे एक ऑटोरिक्षाही आहे त्याचबरोबर काही गायीसुद्ध आहेत. त्या गायींमधल्या साई नावाच्या गायीवर त्याचा जीव आहे आणि साईसुद्ध त्याच्यावर तसेच प्रेम करते. जानने हाक मारताच ती त्याच्या जवळ येते. किंवा तो कामावरून शेतात आला की ती कुठेही असली तरी त्याच्या जवळ येते.

या दोघांच्या प्रेमाची माहिती जानच्या एका मित्राला होती. त्याने एकदा साईची परिक्षा घ्यायचं ठरवलं. मित्राने जानचे हात बांधले आणि त्याला मारण्याचं नाटक केलं. जान साईला मदतीसाठी हाका मारत होता. आपला मालक संकटात आहे हे दिसताच गाय धावतच त्याच्याकडे आली. एवढच नाही तर त्याच्या हाताला बांधलेली दोरीही तिने काढण्याचा प्रयत्न केला. यावरून त्या दोघांमधलं प्रेमाचं नातं दिसून येतं.

संकट काळात प्राणी हे कायम मदत करत असतात. तुम्ही त्यांच्यावर जेवढं प्रेम करता त्यापेक्षा जास्त दुप्पट ते तुमच्यावर प्रेम करतात असं जान याने सांगितलं. वयाच्या 12 वर्षांपासून तो गायींची देखभाल करण्याचं काम करत आहे. सगळ्या गायींमध्ये साईचं माझ्यावर सर्वात जास्त प्रेम असल्याचं त्याने सांगितलं. सोशल मीडियावरही लोक त्यांच्यातल्या अनोख्या प्रेमाचं कौतुक करत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 15, 2020, 6:30 PM IST

ताज्या बातम्या