सूरत, 16 ऑगस्ट : यंदाच्या सणांवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे धामधुमीत नाही पण अगदी साध्या पद्धतीनं ते सण साजरे होत आहेत. गणेशोत्सवही अगदी साध्य पद्धतीनं देशभरात साजरा करण्यात आला तसंच यंदा नवरात्र आणि दिवाळीही अगदी साध्या पद्धतीनं घरी राहूनच साजरी करण्याचं आवाहन केलं जात आहे. तर कोरोनाचं संकट लवकर दूर कर असं भाविक देवीकडे प्रार्थना करत आहेत.
नवरात्र आणि गरबा म्हटलं की गुजरात आठवतं. गुजरातमध्ये मोठ्या संख्येनं दरवर्षी नागरिक गरबा खेळण्यासाठी एकत्र येतात मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यानं पारंपरिक पद्धतीनं गरबा खेळण्यावर बंदी आली आहे. अशा कोरोनाच्या कठीण काळातही नागरिकांना गरबा खेळण्यासाठी एका भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.
#WATCH Gujarat: A group of students of fashion designing in Surat perform 'Garba' sporting hand-painted costumes made of PPE kits. These costumes have been designed by them. (15.10) pic.twitter.com/sKSYk7e3iy
सूरतमध्ये फॅशन डिझाइनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गरबा खेळण्यासाठी एक युक्ती शोधली आहे. या विद्यार्थ्यांनी घागरा आणि पीपीई कीट घालून गरबा खेळला आहे. गुजरातमध्ये शारदीय नवरात्र 17 ते 25 ऑक्टोबरपर्यंत दरम्यान साजरी केली जाणार आहे. हा सूट फॅशन डिझाइनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केला आहे. हा सूट घालून कोरोना काळात गरबा खेळता येईल. हा सूट घालून गरबा खेळल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असेल असा दावा इथल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.