फोडाफोडीच्या भीतीने काँग्रेसने रात्रीतून गुजरातच्या आमदारांना बंगळुरूत हलवलं

फोडाफोडीच्या भीतीने काँग्रेसने रात्रीतून गुजरातच्या आमदारांना बंगळुरूत हलवलं

फोडाफोडीच्या भीतीने काँग्रेसने रात्रीतून गुजरातच्या आमदारांना कर्नाटकमध्ये हलवलंय. राज्यसभेचं मतदान होईपर्यंत हे आमदार बंगळुरूतच राहणार आहेत.

  • Share this:

अहमदाबाद/बंगळुरू, 29 जुलै : गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये भगदाड पडायला सुरुवात झाली आहे...आतापर्यंत गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून काँग्रेसनं आपल्या 42 आमदारांना रात्रीतून विमानाने बंगळुरूमध्ये पाठवलंय... काल रात्री अडीचच्या सुमारास 32 आमदार आणि आज पहाटे 5 वाजता 10 आमदार बंगळुरूला पोहोचले आहेत...या आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एल्गेटन रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होतेय. सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार अहमद पटेलही या निवडणुकीत उभे आहेत. अहमद पटेल यांना निवडून येण्यासाठी किमान 46 मतांची गरज होती. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेस आमदारांची संख्या 57वरून 51 वर घसरलीय. त्यामुळे अहमद पटेल यांना जिंकण्यासाठी किमान 45 मतं आवश्यक आहेत. पण सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे आणखीही काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. म्हणूनच काँग्रेसने रात्रीतून गुजरातमधल्या पक्ष आमदारांना बंगळुरूत हलवलंय. मतदानाच्या तारखेपर्यंत यासर्व आमदारांना तिकडेच एकसंघपणे सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. अहमद पटेल यांना हरवण्यासाठी भाजपकडूनच जाणिवपूर्वक काँग्रेसचे आमदार फोडले जात असल्याचा आरोप होतोय. भाजपने मात्र, हा आरोप फेटाळून लावलाय.

गुजरात राज्यसभा निवडणूक -

राज्यसभेच्या 3 जागांसाठी मतदान

एकूण आमदार मतदारांची संख्या - 182

काँग्रेसच्या 6 आमदारांचा राजीनामा

आमदारांचं घटलेलं संख्याबळ -176

पक्षनिहाय आमदारांची संख्या

भाजप 121

काँग्रेस 57 (6 आमदारांचा राजीनामा) = 51

एनसीपी-2

जेडीयू- 1

जीपीपी -1

निवडून येण्यासाठी आवश्यक मतं - 45

मतदानाची तारीख- 8 ऑगस्ट 2017

First published: July 29, 2017, 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading