Home /News /national /

भरधाव कारनं 3 जणांना चिरडलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO

भरधाव कारनं 3 जणांना चिरडलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO

लोक फुटपाथवर उभे असताना अचानक भरधाव कारनं त्यांना चिरडलं आणि गोंधऴ उडाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

    जेतपूर, 27 नोव्हेंबर : भरधाव कारनं तीन जणांना चिरडत नेल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उ़डाली. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मोठी कार रस्ता सोडून फुटपाथवर गेली आणि कारनं तीन जणांना चिरडलं. या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही संपूर्ण घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या जेतपूर इथे ही घटना घडली आहे. या अपघातामुऴे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता लोक फुटपाथवर उभे असताना अचानक भरधाव कारनं त्यांना चिरडलं आणि गोंधऴ उडाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान अशीच एक घटना गुरुवारी लखनऊमधून देखील समोर आली होती. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. तर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना गुजरातच्या जेतपूर परिसरात गुरुवारी संध्याकाळी उशिरा घडल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे लखनऊमध्ये भरधाव कार रस्ता सोडून थेट दुकानात घुसल्यानं मोठा गदारोळ निर्माण झाला. दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर आजूबाजूचे नागरिक देखील या घटनेमुळे संतप्त झाले होते. दुकानाचं नुकसान झाल्यानं संतप्त स्थानिकांनी कार चालकाची थेट कॉलर पकडून त्याला मारहाण करण्यासाठी गाडीबाहेर खेचून काढलं. कार चालक गाडीबाहेर येताच काही लोकांनी या चालकाला पकडून मारहाण सुरू केली तर काही जणांना त्याला फरफटत नेलं. कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या