मोदी आणि अमित शहांना 'घरात'च दणका, 3 जागांवर पराभव

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांबरोबरच देशभरात पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. गुजरातमध्ये 6 जागांवर या पोटनिवडणुका झाल्या. या 6 जागांपैकी 3 जागांमध्ये भाजपचा पराभव झाला.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 05:08 PM IST

मोदी आणि अमित शहांना 'घरात'च दणका, 3 जागांवर पराभव

अहमदाबाद, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांबरोबरच देशभरात पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. गुजरातमध्ये 6 जागांवर या पोटनिवडणुका झाल्या.

या 6 जागांपैकी 3 जागांमध्ये भाजपचा पराभव झाला. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले अल्पेश ठाकूर यांनाही राधननगरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अल्पेश ठाकूर आणि धवल सिंह जाला हो दोघांनीही राजीनामा दिल्यामुळे या पोटनिवडणुका झाल्या.

या 6 जागांपैकी 4 जागा भाजपकडे होत्या. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत होती. या निवडणुकांमध्ये मोदी फॅक्टर असेल, असा एक्झिट पोलचा अंदाज होता. पण निकाल वेगळेच लागले. गुजरातप्रमाणेच छत्तीसगडच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला.

(हेही वाचा : कल्याणमध्ये धावलं मनसेचं इंजिन, 'ही' आहेत विजयाची समीकरणं)

महाराष्ट्रातही भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. त्या तुलनेत शिवसेनेची कामगिरी चांगली झाली. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपला शिवसेनेशी वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. हरियाणामध्येही मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली पण इथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. इथेही सत्तास्थापनेसाठी त्यांना दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाची मनधरणी करावी लागतेय.

Loading...

=========================================================================================

उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला इशारा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...