भाजप आमदाराला हायकोर्टाचा झटका, फेरनिवडणूक होणार

भाजप आमदाराला हायकोर्टाचा झटका, फेरनिवडणूक होणार

आमदार प्रभू माणेक यांनी निवडणूक अर्ज भरताना चूक केली आहे, असा आक्षेप त्यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराने नोंदवला होता.

  • Share this:

सुरत, 12 एप्रिल : गुजरातमधील द्वारका येथील भाजप आमदार यांचं सदस्यत्व हायकोर्टाने रद्द केलं आहे. त्यामुळे द्वारका मतदारसंघात फेरनिवडणूक होणार आहे. प्रभू माणेक असं सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या भाजप आमदाराचं नाव आहे.

आमदार प्रभू माणेक यांनी निवडणूक अर्ज भरताना चूक केली आहे, असा आक्षेप त्यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराने नोंदवला होता. त्यानंतर याबाबत हायकोर्टात सुनावणी सुरू होती. आता याबाबत अखेर कोर्टाने आपला निकाल सुनावला आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे.

दरम्यान, 2017 साली झालेल्या गुजरातमधील या विधानसभा निवडणूक यश मिळवत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं होतं. पण या निवडणुकीत काँग्रेसनंही चांगलीच झुंज दिल्याचं पाहायला मिळालं.

या निवडणुकीत पाटीदार नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेते जिग्नेश मेवानी या तरुण तिकडीने भाजपसमोर आव्हान निर्माण केलं होतं. त्यामुळे भाजपला 100 जागांचा आकडा गाठता आला नव्हता.

राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

First published: April 12, 2019, 1:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading