मराठी बातम्या /बातम्या /देश /गुजरातमध्ये 5 वर्षांपूर्वीपासूनच होता 'कोरोना'; आता झालाय सेल्फी पॉइंट

गुजरातमध्ये 5 वर्षांपूर्वीपासूनच होता 'कोरोना'; आता झालाय सेल्फी पॉइंट

चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

अहमदाबाद, 08 मे : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत या कोरोनामुळे 75 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दरम्यान, लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. मात्र गुजरातमधील बनासकांठा इथं 5 वर्षांपासून कोरोना ठळक अक्षरात झळकत आहे.

गुजरातमधील बनासकांठा इथं एक हॉटेल आहे. या हॉटेलचं नाव कोरोना असं ठेवण्यात आलं आहे. राजस्थान बॉर्डरवर असलेल्या अमीरगढ इथं कोरोना नावानं असलेल्या या हॉटेलकडं आता पाहिलं की लोकांना धक्का बसतो. हे हॉटेल 2015 मध्ये सुरू कऱण्यात आलं होतं.

सध्या लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. मात्र कोरोना असं नाव असल्यानं लोक हॉटेलसमोर थांबतात आणि सेल्फी काढतात. लोकांमध्ये या हॉटेलचं कुतुहल वाढत आहे. सेल्फी काढणाऱ्यांचं प्रमाण इतकं आहे की हे ठिकाण आता सेल्फी पाँइंट झालं आहे.

हे वाचा : पुण्यातील म्युझियमने खरेदी केली पाक क्रिकेटपटूची बॅट, 'या' कारणासाठी केला लिलाव

सिद्धपूर इथं राहणाऱ्या बरकतभाई यांनी 2015 मध्ये हॉटेल सुरू केलं होतं. तेव्हा नाव काय ठेवायचं असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यावेळी उर्दू शब्द कोरोना आठवला. उर्दूत कोरोनाचा अर्थ स्टार गॅलेक्सी असा आहे. आता जेव्हापण लोक या हॉटेलसमोरून जातात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो.

हे वाचा : मुलीच्या वर्दीवरचे स्टार पाहतायत वडील, बापलेकीचा PHOTO होतोय व्हायरल

First published:
top videos

    Tags: Corona virus in india