मुंबई, 24 मे : 1993 च्या साखळी बॉम्ब स्फोटातील (Mumbai 1993 chain bomb blast) मुख्य आरोपींपैकी चार आरोपींनी भारतातून पळ काढला होता. त्या आरोपींना नुकतंच गुजरात (Gujrat) राज्यातील अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हे दहशतवादी भारतात परत कशाकरता आले होते याही पेक्षा हे भारतात किती वेळा ये-जा करत होते आणि सुरक्षेला चकवा देत होते? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण हे चारही जण सतत भारतात ये-जा करायचे, असा खुलासा तपासात झालाय.
अबू बकर, यूसुफ भाटाका, शोएब बाबा आणि सैयद कुरैशी अशी या चार दहशतवादींची नावे आहेत. त्यांनी 1993 च्या साखळी बॅाम्बस्फोटात प्रमुख भूमिका बजावली होती. त्यानंतर ते भारताबाहेर फरार झाले होते. पण खरंच हे भारताबाहेर फरार झाले होते की भारतात लपून बसले होते? असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण पासपोर्टची वॅलिडीटी संपली होती. ती रिन्युव्ह करायला हे दहशतवादी भारतात परत आले होते.
हे चारही दहशतवादी सापडत नव्हते म्हणून त्यांच्या विरोधात रेड कॅार्नर नोटीस जारी करण्यात आली होती. पण असं असतानाही फक्त नाव आणि पत्ता बदलून हे चारही जण सतत भारतात येत-जात होते. याबाबत गुप्तचर यंत्रणा तसेच सर्वच तपास यंत्रणांना इतकी वर्षे माहिती मिळाली नाही. हे तपास यंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल. अहमदाबादला येण्याआधी हे चौघे दुबईला होते आणि त्याआधी कुठे होते? याचा अजून तपास सुरु आहे. गुजरात ATSने या चौघांना बनावट पासपोर्ट प्रकरणी अटक केली होती.
(महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा)
अबू बकर हा जावेद बाशा या खोट्या नावाने आणि कर्नाटकचा नागरीक असल्याच्या बनावट पासपोर्टच्या साहाय्याने भारतात आला होता. तर सय्यद कुरेशी हा सय्यद शरीफ राहणार चेन्नई, शोएब कुरेशी हा सय्यद यासीन राहणार कर्नाटक आणि युसूफ भटका हा युसूफ इस्माईल राहणार मुंबई या बनावट पासपोर्टवर भारतात आले होते.
1993 च्या साखळी बॅाम्बस्फोटावेळेस हे चौघे अर्जून गॅंगशी संबंधीत होते. या गँगचा म्होरक्या मोहम्मद डोसा होता जो दाऊदच्या डी कंपणीतील प्रमुखांपैकी एक होता. डोसाच्या माध्यनातून हे चौघेही डी गॅंगशी संपर्कात होते. त्यावेळेस हे चौघे पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेवून आले होते. तिथे त्यांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार 93 च्या साखळी बॅाम्बस्फोटात या चौघांनी अनेक बॉम्ब बनवले आणि प्लांटही केले, ज्यात 257 जणांचा मृत्यू झाला. तर 700 पेक्षा जास्त जण जख्मी झाले.
गुजरात ATSने केलेल्या तपासात हे फक्त भारतात येण्यासाठी बनवाट पासपोर्टचा वापर करायचे. पण 93 साखळी बॅाम्बस्फोटानंतर डी गॅंगशी संपर्कात नव्हते. मग हे इतकी वर्षे काय करत होते आणि भारतात येवून काय करायचे? याचं गूढ अजूनही कायमच आहे. गुजरात एटीएसने केलेल्या या कारवाईसाठी गुजरात ATSचे ADG अमित विश्वकर्मा, DIG OPERATION दिपेन भद्रंन आणि टीमचे कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.