S M L
Football World Cup 2018

गुजरात विधानसभेत काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला पट्ट्याने मारलं

काँग्रेस आमदार प्रताप दुधात आणि भाजप आमदार जगदीश पंचाल यांच्यात कुठल्या तरी कारणावरून शाब्दिक वाद झाला.

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2018 05:01 PM IST

गुजरात विधानसभेत काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला पट्ट्याने मारलं

14 मार्च : गुजरात विधानसभेत काँग्रेस आणि भाजप आमदारामध्ये तुफान राडा पाहण्यास मिळालाय. काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने मारहाण केली.

काँग्रेस आमदार  प्रताप दुधात आणि भाजप आमदार जगदीश पंचाल यांच्यात कुठल्या तरी कारणावरून शाब्दिक वाद झाला. नंतर हा वाद इतका विकोपाला गेला की दोघेही हमरीतुमरीवर आले. या धुमश्चक्रीत रागाच्या भरात प्रताप दुधात यांनी कमरेचा बेल्ट काढून पंचाल यांना भरसभागृहात मारहाण केली.

दोन्ही आमदारांचा वाद विकोपाला गेल्याचं पाहुन इतर आमदारांनी मध्ये उडी घेत दोन्ही आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस आमदार विक्रम माडम यांनी सभागृहातला माईक तोडला. दोन्ही आमदारांना शांत राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही कारवाई करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close