मराठी बातम्या /बातम्या /देश /

सर्वसामान्य दाम्पत्याची 'असामान्य' कहाणी; कुटुंबाचा विरोध झुगारुन दत्तक घेतली मुलगी, आज तिचा सर्वांनाच अभिमान

सर्वसामान्य दाम्पत्याची 'असामान्य' कहाणी; कुटुंबाचा विरोध झुगारुन दत्तक घेतली मुलगी, आज तिचा सर्वांनाच अभिमान

धर्मेंद्रभाई सुतार आणि त्यांच्या पत्नी कुसुमबेन घेतलेला निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मुलगी दत्त घेऊन तिला तिच्या पायावर उभंं करण्यापर्यंतच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

    गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतात. गुजरातमधील एका दाम्पत्याने एक निर्णय घेतला आणि तो यशस्वी करुन दाखवला. या दाम्पत्याने अनाथ मुलगी दत्तक घेऊन तिचं पालन-पोषण केलं. सोबतच तिला उच्च शिक्षण देत तिला समाजात स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी दिली. मात्र मुलगी दत्तक घेऊन तिला स्वत:च्या पायावर उभं करणं हा प्रवास सोपा नव्हता. मात्र या दाम्पत्याने घेतलेला निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. धर्मेंद्रभाई सुतार आणि त्यांच्या पत्नी कुसुमबेन या जोडप्याने एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिला उत्तम प्रकारे वाढवलं आणि तिच्या दर्जेदार शिक्षणासाठीही सर्वस्व पणाला लावलं. सुतार दाम्पत्याला लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूल झाले नाही. त्यामुळे कुसुमबेन यांनी मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना मुलगीच दत्तक घ्यायची होती. त्यांच्या या इच्छेला पती धर्मेंद्रभाई यांचीही साथ मिळाली. मुलगी दत्तक घेण्याच्या विचारात असताना कुसुमबेन यांच्या वडिलांची एका लहानग्या मुलीबद्दल त्यांना माहिती दिली. त्यांची पोस्टिंग राजपिपळा वनपरिक्षेत्रात होती. तेथे एका स्थानिक व्यक्तीची 11 महिन्यांची अनाथ मुलगी होती. सुतार दाम्पत्याने मूल दत्तक घेण्यास होकार दिला. यासाठी घरच्यांच्या विरोध असतानाही तो न जुमानता सुतार दाम्पत्याने या मुलीला आपलं केलं. या मुलीचं नाव 'दुर्गा' होतं. जन्मताच तिने आपल्या आईला गमावलं होतं. त्यामुळे आईचे दूध देखील तिला मिळू शकले नाही, जे तिच्या अशक्तपणाचे प्रमुख कारण बनलं. शारीरिकदृष्ट्या अशक्त असल्याने तिला दत्तक घेण्यास कुटुंबीयांचा विरोध होता, मात्र सुतार दाम्पत्य आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी आपल्या मुलीच्या आजारपणात घालवली. यानंतर ती हळूहळू बरी झाली आणि एक सामान्य मुलगी म्हणून खेळू-बागडू लागली. आता 'दुर्गा' समोर शिक्षण आणि करिअर अशी आव्हानं होती. सुतार दाम्पत्याने मुलीवर शिक्षणाबाबत कोणताही दबाव टाकला नाही. तिला तिचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलं होतं. जसजशी दुर्गा मोठी होत गेली तसतशी आई कुसुमबेन यांनी मुलीकडे चित्र काढण्याचे कौशल्य असल्याचे पाहिले. हेच कौशल्या पारखून पदवीनंतर दुर्गाने नॅशनल स्कूल ऑफ डिझाइनमधून डिझायनिंगमध्ये प्रवेश घेत मास्टर्स पदवी मिळवली. टॉपर विद्यार्थिनी असल्याने दुर्गाला कॅम्पसमध्येच चांगली नोकरी मिळाली आणि आता ती एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर काम करत आहे. तिलाही भविष्यात आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत एक अनाथ मूल दत्तक घ्यायचे आहे. दुर्गा म्हणते, 'माझ्यासाठी पालक हे केवळ शब्द नाहीत, तर संपूर्ण जग आहेत. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी जे काही केले ते सर्व मला एका अनाथ मुलाला द्यायचे आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gujrat, Parents

    पुढील बातम्या