अहमदाबाद, 16 मार्च : गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांच्या आत गुजरात काँग्रेसची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे. हॅकर्सनी वेबसाइटवर हार्दिक पटेलचा आक्षेपार्ह फोटो टाकला आहे. 2017 च्या निवडणुकीच्या आधीही त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यातील एक स्क्रीनशॉट आहे.
हॅकर्सनी या फोटोमध्ये हार्दिक पटेलशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीला एका मुलीसोबत दाखवले आहे. त्यावर लिहले आहे की, आमच्या नव्या नेत्याचे स्वागत आहे. ही घटना शुक्रवारी समोर आल्यानंतर काँग्रेसने तात्काळ वेबसाइट बंद केली. या प्रकाराची चौकशी कऱण्यात येणार असल्याचेही नेत्यांनी सांगितले आहे.
याबाबत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले की, वेबसाइटला तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात आलं आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वेबसाइट पुन्हा सुरू करण्यात आली आहे. हार्दीक पटेल काँग्रेसमध्ये आल्याचे ज्यांना खटकले त्यांनीच हा प्रकार केला असल्याचे मनीष दोशींनी सांगितले.
याआधी भाजपची वेबसाइट हॅक झाली
काही दिवसांपूर्वी पक्षाची वेबसाइट bjp.org हॅक झाली होती. भाजपच्या वेबसाइटला भेट दिल्यास आम्ही लवकरच परत येऊ असा संदेश दिसत होता. 5 मार्चला सकाळी 11 वाजता हॅक झाली होती. भाजपची साइट हॅक झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेल इनचार्ज दिव्या स्पंदना यांनी खिल्ली उडवली होती.
उद्धव ठाकरेंनी केले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक, पाहा UNCUT भाषण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा