Home /News /national /

खेळता खेळता Borewell मध्ये पडला 3 वर्षांचा चिमुकला; पाहा Rescue Operation चा Video

खेळता खेळता Borewell मध्ये पडला 3 वर्षांचा चिमुकला; पाहा Rescue Operation चा Video

Gujrat 3 Year old boy fall in borewell : चिमुकल्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी आर्मीच्या जवानांनी पूर्ण ताकद पणाला लावली.

    अहमदाबाद, 07 जून : खेळता खेळता लहान मुलं बोअरवेलमध्ये पडल्याची बरीच प्रकरणं याआधी समोर आली आहेत. बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्सला तर तुम्ही आजही विसर नसाल. अशीच एक घटना आता पुन्हा घडली आहे. गुजरातमध्ये एक चिमुकला खेळताना बोअरवेलमध्ये पडला. अवघ्या दोन-तीन वर्षांचा हा चिमुकला आहे. या मुलाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओही समोर आला आहे (Gujrat 3 year old boy fall in borewell). धांग्रधाच्या दुदापूर गावातील ही घटना आहे. मजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील हा मुलगा. बोअरवेलजवळ खेळत होता. त्याचवेळी तो बोअरवेलमध्ये पडला. मुलाच्या बचावासाठी आर्मीचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चिमुकल्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाली. जवानांनी चिमुकल्याला वाचवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. अखेर त्यांना यश मिळालं. मुलाला त्यांनी बोअरवेलमधून बाहेर काढलं. त्याला तात्काळ उपचारासाठी ध्रांगध्राच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे वाचा - आश्चर्य! 21 व्या मजल्यावरून कोसळूनही 55 वर्षांची महिला जिवंत; कसा झाला चमत्कार पाहा या चिमुकल्याची प्रकृती कशी आहे, हे अद्याप माहिती नाही. पण याआधी बोअरवेलमध्ये पडलेल्या काही मुलांचा जीवही गेला आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडल्या आहे. 2015 साली  उस्मानाबाद जिल्ह्यात केशेगाव या गावातील अनिकेत पाटोळे या 4 वर्षांच्या मुलालाला 300 फूट खोल बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आलं. पण त्याचा जीव वाचवता आला नाही. जेव्हा त्याला बोअरवेलमधून बाहेर काढलं तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं. तर त्यानंतर 2016 साली पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षांच्या सुनील मोरेला तब्बल 31 तासांनंतर बाहेर काढण्यात यश आलं. पण उपचारादरम्यान सुनीलला दुदैर्वी मृत्यू झाला होता.  चार वर्षांच्या या चिमुरड्याची बोअरवेलमधली 31 तासांची झुंज अपयशी ठरली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Gujrat, Viral, Viral videos

    पुढील बातम्या