'शरीराचे 36 तुकडे केले तरीही मी भाजपमध्ये जाणार नाही'

गुजरातमधील काँग्रेसचे आमदार मोठ्या प्रमाणात फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 08:50 PM IST

'शरीराचे 36 तुकडे केले तरीही मी भाजपमध्ये जाणार नाही'

अहमदाबाद, 29 मे : गुजरातमधील काँग्रेसचे आमदार मोठ्या प्रमाणात फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमधील काँग्रेसचे तब्बल 15 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा काँग्रेसचे बंडखोर आमदार अल्पेश ठाकोर यांनी केला होता. यावरूनच काँग्रेसचे आमदार फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय दंगल सुरू झाली आहे. यादरम्यान, काँग्रेसमधील बरीच मोठी फळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

काँग्रेसमधील 10 हून अधिक आमदार लवकरच भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.  राजकारणातील जाणकारांनुसार, गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बरेच नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाऊ  शकतात.

पाहा :VIDEO : विधानसभेच्या निवडणुकीबाबत माझी भूमिका ठाम - विश्वजीत कदम

दुसरीकडे, राज्यसभेच्या दोन्ही जागा आपल्याच ताब्यात कशा राहतील, याची पूर्ण तयारी भाजपनं केली आहे. गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अमेठीतून स्मृती इराणी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर येथील राज्यसभेच्या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागांसाठी आता रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

पाहा:SPECIAL REPORT : मोदींचा शपथविधी सोहळा; निमंत्रितांच्या यादीत पाकिस्तानला डच्चू

Loading...

'शरीराचे 36 तुकडे केले तरीही भाजपमध्ये जाणार नाही'

दरम्यान, काँग्रेस पक्ष एकजूट असून कोणीही भाजपमध्ये जाण्याचा विचारही करत नाहीय, असं सांगत काँग्रेस नेते आणि आमदारांनी भाजपप्रवेशाच्या निव्वळ अफवा असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे.

'माझ्या शरीराचे 36 तुकडे जरी केले तरीही मी भाजपप्रवेश करणार नाही', असं विधान जामखामभलियातील काँग्रेसचे आमदार विक्रम मादाम यांनी केलं आहे.'न्यूज18 गुजरात टीव्ही'सोबत साधलेल्या संवादादरम्यान विक्रम मादाम यांनी हे विधान केलं आहे.

'जी लोक माझ्या भाजपप्रवेशाबाबतची अफवा पसरवत आहेत, ते सनकी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मी आपल्या मतदारसंघात फिरत आहेत', असे म्हणत मादाम यांनी वृत्त निराधार असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे आमदार शिवभाई भूरिया यांनीही भाजपप्रवेशाची अफवा असल्याचं म्हटलं आहे.पण या खरंच अफवा आहेत का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO : चंद्रपूर नव्हे सूर्यपूर! कडक उन्हामुळे होतंय अंड्याचं ऑम्लेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...