दारूच्या नशेत डाॅक्टरानं केलं आॅपरेशन, आईसह बाळाचा गेला जीव

दारूच्या नशेत डाॅक्टरानं केलं आॅपरेशन, आईसह बाळाचा गेला जीव

आॅपरेशन थिएटर बाहेर नातेवाईक वाट पाहत होते. पण खूप वेळ झाला तरी डॉक्टर बाहेर येत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांना संशय बळावला

  • Share this:

गुजरात, 27 नोव्हेंबर : 'दारूच्या आहारी जावू नका' असं डाॅक्टर सल्ला देत असतात पण गुजरातमध्ये एका डाॅक्टराने दारूच्या नशेत एका महिलेची प्रसुती केली यात तिचा आणि नवजात बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बोटाद इथं घडली आहे.


बोटाद इथं सरकारी रुग्णालय हे शेकडो गरीब कुटुंबांसाठी मोठा आधार आहे. कामिनी नावाच्या महिलेला प्रसुती कळा यायला लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरही रुग्णालयात हजर होते. कामिनींच्या नातेवाईक गोड बातमीच्या प्रतिक्षेत होते.


आॅपरेशन थिएटर बाहेर नातेवाईक वाट पाहत होते. पण खूप वेळ झाला तरी डॉक्टर बाहेर येत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांना संशय बळावला. नातेवाईकांनी विचारणा केली तेव्हा त्यांना हादराच बसला. आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.


नातेवाईकांना आपल्यासोबत अचानक घडलेल्या प्रसंगावर विश्वासच बसला नाही. त्यांनी डॉक्टरांवर आक्षेप घेत रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तिथे पोलीसही पोहोचले.


डाॅक्टरांनी दारूच्या नशेत होता असा आरोप नातेवाईकांनी केला. अखेर पोलिसांनी या डाॅक्टराची ब्रेथ एनेलाईजर केली. त्यात डाॅक्टर हा दारूच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं. दारूच्या नशेतच डाॅक्टराने महिलीची प्रसुती केल्याचं स्पष्ट झालं.


प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलिसांनी डाॅक्टराला अटक केली आणि त्याच्याविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.


================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 08:31 PM IST

ताज्या बातम्या