मेहसाणा, 6 मे : एका धक्कादायक घटनेत न्यायालयाने सात वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे दिला. मुलगी दोन दिवसांची असताना तिच्या पालकांनी तिला सोडून दिलं होतं. मुलगी सात वर्षे अनाथाश्रमात राहिली आणि सात वर्षानंतर आता कोर्टाने तिचा ताबा वडिलांकडे दिला आहे. आईने मुलाला वडिलांकडे सोपवण्यापूर्वी एक अट घातली की तो तिला आयुष्यात कधीही सांगणार नाही की, ती तिची आई आहे आणि तिला कधीही आपल्याकडे आणणार नाही.
ही हृदय हेलावून टाकणारी घटना गुजरातमधल्या मेहसाणातील रणसन गावात घडली आहे. येथे मुलीच्या जन्मानंतर दुसऱ्या दिवशी आई-वडिलांनी तिला बसस्थानकावर सोडून दिलं होतं. 5 ऑक्टोबर 2015 रोजी अर्जुनपुरा गावातील बसस्थानकाजवळ हा प्रकार घडला. मात्र, बाळाला सोडून गुपचूप निघून जात असताना काही लोकांनी त्यांना पाहिले. या स्थानिक लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मुलीच्या सोडून दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि मुलीला गांधीनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
मुलीचे जैविक (जन्मदाते) आई-वडील चुलत बहीण-भाऊ आहेत. दोघांमध्ये शारीरिक संबंध आल्यानंतर एका मुलीचा जन्म झाला होता. त्यांचं लग्न झालं नव्हतं आणि नात्यात भावंड असल्यानं त्यांना समाजाकडून बोल लावण्याची भीती होती. दरम्यान, त्यांना गर्भपातही करता आला नाही. त्यामुळे गुप्तपणे मुलाच्या जन्माची योजना आखण्यात आली.
दुसऱ्या दिवशी मुलीला सोडलं
मुलीला सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये आणि नंतर अनाथाश्रमात ठेवण्यात आलं. या मुलीला रुग्णालयातून ओढव येथील एका क्रशेत पाठवण्यात आले आणि तेथून तिला कालुपूर येथील एका धार्मिक संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनाथाश्रमात ठेवण्यात आले. पुराव्याअभावी मुलीला सोडून दिल्याच्या आरोपातून कलोल येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मुलीच्या जन्मदात्या पालकांची निर्दोष मुक्तता केली. येथे या मुलीच्या जैविक वडिलांनी अर्ज केला की, त्यांना मुलीचा ताबा हवा आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी दीपा ठकार यांनी मुलीच्या ताब्यासाठी वडिलांच्या विनंतीची दखल घेतली.
मुलीच्या वडिलांनी घेतली कस्टडी
कोर्टाने निरीक्षण नोंदवलं की, आईला मुलीबद्दल प्रेम नाही. तर, वडिलांना मात्र तिला अनाथ म्हणून वाढवायचं नसल्यामुळे तिचा ताबा आपल्याकडे घेण्याचा आग्रह धरला. न्यायालयाने आपल्या आदेशात जन्मदात्या आईचं म्हणणं तपशीलवार नोंदवलं आहे. मुलीची जन्मदात्री आई म्हणाली, "जर मूल एखाद्याला दिलं असेल तर, मला कोणतीही अडचण नाही. परंतु, तिचा माझ्याशी कोणताही संबंध असू नये."
हे वाचा - मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह, भररस्त्यात लोकांच्या देखत तरुणाचा भयंकर शेवट
'या मुलीमुळे मला सामाजिक कलंक लागेल'
जेव्हा महिलेनं म्हटलं की, मुलीमुळे तिचं भविष्य धोक्यात येऊ शकतं आणि तिची उपस्थिती स्वतःचं (आईचं) जीवन सामाजिक कलंकाच्या धोक्यात आणू शकतं, तेव्हा न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. आईने कोर्टात सांगितलं की, 'मला समाजाची भीती वाटते म्हणून मला मुलीला माझ्याकडे ठेवायचं नाही. जर कोणी मला विचारलं की, ते कोणाचं मूल आहे, तर मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला लाज आणि संकोच वाटेल.'
हे वाचा - सेल्फीकरता बुरखा हटवाल तर... मुस्लीम संघटनांचा महिलांविरोधात अजब फतवा
या महिलेने पुढे सांगितलं की, 'मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे दिल्यास मला कोणतीही अडचण नाही. परंतु, केवळ या अटीवर की, ते तिला कधीही माझ्याकडे आणणार नाहीत आणि मी तिची आई आहे, हे तिला कधीही सांगणार नाहीत'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.