'लव्ह मॅरेज करू नका'; Valentine's Dayला विद्यार्थ्यांना दिली जात आहे शपथ

'लव्ह मॅरेज करू नका'; Valentine's Dayला विद्यार्थ्यांना दिली जात आहे शपथ

Valentine's Dayच्या निमित्ताने गुजरातमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना प्रेम न करण्याची शपथ दिली जाणार आहे.

  • Share this:

सुरत, 14 फेब्रुवारी: Valentine's Dayच्या निमित्ताने गुजरातमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना प्रेम न करण्याची शपथ दिली जाणार आहे. ही शपथ देण्यामागचा उद्देश भविष्यात मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या ईच्छेविरुद्ध लव्ह मॅरेज करु नये असा आहे. सुरतमधील या शाळेत किमान 10 हजार मुले आणि मुली आहेत. त्या सर्वांना ही शपथ दिली जाणार आहे.

हे देखील वाचा: CBSEची मुलं म्हणणार, पेपर सोपा गेला! बोर्डाने बदललं प्रश्नपत्रिकेचं स्वरुप

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या शाळेतील विद्यार्थ्यांना अशी शपथ देण्यात येणार आहे की, ते आई-वडिलांच्या परवानगी शिवाय लग्न करणार नाहीत. त्याचबरोबर पालकांना न आवडणाऱ्य़ा मुला अथवा मुलीसोबत रिलेशन ठेवणार नाहीत. पालकांच्या इच्छेनुसारच किंवा त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करु, असे देखील शपथेमध्ये म्हटले आहे. सुरतमधील हास्यमेव जयते नावाच्या संस्थेकडून ही शपथ दिली जाते. या संस्थेचे अध्यक्ष कमलेश मसालावाल 12 इयत्तेतील १ ० हजार विद्यार्थ्यांना Valentine's Dayच्या दिवशी ही शपथ देणार आहेत.

वाचा: भाजप आमदाराची बायको आणि पदाधिकारी महिलेमध्ये हाणामारी, VIDEO आला समोर

मुलांना पालकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे महत्त्व कळावे, यासाठी ही शपथ दिल्याचे कमलेश यांनी सांगितले. लहान वयात केलेला विवाह फार काळ टिकत नाही, असे ही ते म्हणाले. येत्या 14 फेब्रुवारी रोजी 15 शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ दिली जाणार आहे.

गुजरातमधील प्रसिद्ध कवी मुकुल चौक्सी यांनी ही शपथ लिहली आहे. त्यांना कलापी पुरस्कार मिळाला असून गुजरातमधील लैंगिक शिक्षणावर त्यांनी पुस्तक देखील लिहले आहे.

जेव्हा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला कुत्रा देतो हुलकावणी; थरारक VIDEO

First published: February 13, 2019, 12:29 PM IST

ताज्या बातम्या