OMG! शाही थाट...वरातीमध्ये उडवले 90 लाख रुपये, VIDEO VIRAL

OMG! शाही थाट...वरातीमध्ये उडवले 90 लाख रुपये, VIDEO VIRAL

लग्नाच्या वरातीमध्ये पैशांचा पाऊस, 2 हजार आणि 500च्या नोटांचं उडवलं बंडल.

  • Share this:

जामनगर, 01 डिसेंबर: लग्नाच्या वरातीमध्ये दोन हजार आणि 500 रुपयांच्या नोटा उधळल्याची घटना गुजरातमधील जामनगर परिसरात घडली आहे. नवरदेवाचे नातेवाईक गाडीवर चढून पैसे उडवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जामनगर परिसरात या लग्नाची तुफान चर्चा होत आहे. या लग्नाच्या वरातीमध्ये नवरदेवाच्या नातेवाईकांनी जवळपास 90 लाख रुपये उडवल्याची चर्चा आहे. वरातीमध्ये झालेल्या पैशांच्या पावसामुळे हे लग्न सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.

चेला गावातील जडेजा कुटुंबात लग्नसमारंभ होता. नवरदेव ऋषिराज जडेजा यांच्या घरात लग्नसमारंभ होता. वरातीमध्ये नवरदेवाच्या नातेवाईकांना तुफान पैशांची उधळण केली.

गुजरातमधील जामनगर इथे झालेल्या ह्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या लग्नात उधळलेले पैसे गोशाळेला दान करण्यात आले आहेत अशी माहिती मिळत आहे. लाखोरुपयांच्या नोटा वरातीमध्ये उधळल्यानं ह्या लग्नाची गुजरातमध्ये तुफान चर्चा होत आहे. नवरदेवाच्या नातेवाईकांनी कुणी गाडीवर चढून तर कोणी गाडीच्या बोनेटवर उभं राहून नोटांची उधळण केली आहे.नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवानं हेलिकॉप्टर आणलं होतं. हेलिकॉप्टरमधून नवरीची पाठवणी करण्यात आली. त्यानंतर नवरदेवाच्या मोठ्या भावानं दोघांना एक करोडची गाडी लग्नात भेट दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान वरातीमध्ये उधलेले पैसे हे 5 गावांमधील गोशाळांना दान करण्यात येणार आहेत. अशी माहिती नवरदेवाकडच्या कुटुंबियांनी दिली आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

Published by: Kranti Kanetkar
First published: December 1, 2019, 10:20 AM IST
Tags: Gujrat

ताज्या बातम्या