तिसऱ्या मजल्यावरून पडला 2 वर्षांचा चिमुकला, पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

तिसऱ्या मजल्यावरून पडला 2 वर्षांचा चिमुकला, पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

दैव बलवत्तर म्हणून, इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावरून पडूनही चिमुकला सुखरुप वाचला.

  • Share this:

दमण, 04 डिसेंबर: इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावरून पडलेल्या लहान मुलाला तरुभरही लागलं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा मुलगा तीसऱ्या मजल्यावरून खाली पडताच खाली उभ्या असलेल्या नागरिकानी त्याला झेलल्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गुजरात जवळील दीव-दमण परिसरात धक्कादायक प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात आहे.

लहान मुलगा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचं तिथे असलेल्या स्थानिकांनी सांगितलं आहे. इमारतीखाली उभ्या असलेल्या लोकांनी त्या मुलाला झेललं आणि त्याचा जीव वाचला आहे. हा चिमुकला दमण इथल्या खारीवाडा परिसरात रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी रात्री घडली. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तो भाग केंद्रशासित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

खारीवाडा परिसरात एका इमरतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरून हा लहान मुलगा खेळता खेळता तोल जाऊन पडला. तिथून तो घसरत दुसऱ्या मजल्यावर आला आणि काही क्षणात खाली कोसळणार एवढ्यात तिथल्याच स्थानिकांनी त्याचा जीव वाचवला. दुसऱ्या मजल्यावर मुलगा लटकल्याचं स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र क्षणात मुलाचा हात सुटला आणि स्थानिकांनी लगबगीनं त्याला कॅच करत त्याचा जीव वाचवला.

दरम्यान मुलाच्या कुटुंबियांनी स्थानिकांचे मनोमन आभार मानले. आपला मुलगा सुखरूप असल्याचं कळताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपला मुलाचा जीव वाचवल्यानं त्यांनी हात जोडून जीव वाचवणाऱ्यांचे आभार मानले. 'जर त्यावेळी माझ्या मुलाला वाचवलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र ही लोक देवासारखे धावून आल्यानं आमचा मुलगा वाचला', अशी प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 4, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading