इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची 18 वर्षांनी झाली डायपरपासून सुटका!

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची 18 वर्षांनी झाली डायपरपासून सुटका!

18 वर्षांच्या प्रकाश आयुष्यात सुखानं झोप मिळण्याचा हा पहिलाच आठवडा होता जेंव्हा त्याला झोपताना डायपर (Diaper) लागलं नाही.

  • Share this:

सुरत, 25 जानेवारी : गुजरातमधील प्रकाश (बदललेलं नाव) हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. गेल्या आठवडाभरापासून त्याला रात्री शांत झोप लागत आहे. 18 वर्षांच्या प्रकाश आयुष्यात सुखानं झोप मिळण्याचा हा पहिलाच आठवडा होता जेव्हा त्याला झोपताना डायपर (Diaper) लागलं नाही. वास्तविक प्रकाशला meningomyelocele (spina bifida) हा आजार आहे. आजारामुळे प्रकाशला सतत वॉशरुमला (Washroom) जावं लागत होतं. या आजारामुळे तो लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. त्यामुळे त्याला अठराव्या वर्षी देखील डायपर घालावे लागत होते.

एका तरुण मुलासाठी ही गोष्ट मोठी विचित्र होती. त्याला  शारीरिक त्रास तर होत होताच, पण त्याची मोठी मानसिक कुचंबणाही होत होती. सुरतचे मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुबोध कांबळे यांनी या आजारातून प्रकाशची सुटका व्हावी यासाठी ब्लॅडर सर्जरी केली. या सर्जरीनंतर प्रकाशचं आयुष्य डायपरमुक्त झालं आहे. त्यामुळे प्रकाश मागच्या आठव्यात पहिल्यांदाच सलग 9 तास शांत झोपू शकला.

काय आहे हा आजार?

प्रकाशला झालेल्या आजाराबद्दल डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅडरमध्ये युरीन रोखून धरण्याचं काम हे आपले स्नायू आणि तंत्रिका तंत्र एकत्र करतात. त्यामुळे आपलं शरीर आज्ञा देईपर्यंत युरीन विसर्जन होत नाही. प्रकाशसारखा आजार झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅडरला आदेश देणारी शरिरातील यंत्रणा नीट काम करत नाही. त्यामुळे ती अनेकदा स्वत:हून सक्रीय होते. त्याचा परिणाम म्हणजे टॉयलेटमध्ये जाण्यापूर्वीच शरीरातली युरीन लीक होतं.

प्रकाश तीन वर्षांचा असल्यापासून डायपर घालत होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तो आठ वर्षांचा असताना त्याचं एक ऑपरेशन झालं. त्यानंतर त्याच्या शरिरातील न्यूरोजनिक ब्लॅडर डेव्हलप झाले होते. त्यामुळे त्याचं नियंत्रण कमी झालं. या आजारामुळे प्रकाशला दिवसातून 25 वेळा तर रात्री जवळपास 10 वेळा लघवीसाठी जावं लागत असे. या युरीन लिकेजच्या त्रासातून त्याची अखेर सुटका झाली आहे.

Published by: News18 Desk
First published: January 25, 2021, 10:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या