S M L

आंबेडकर आणि मोदी 'ब्राम्हण' तर श्रीकृष्ण 'ओबीसी', भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनंतर आता गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी हे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 30, 2018 01:08 PM IST

आंबेडकर आणि मोदी 'ब्राम्हण' तर श्रीकृष्ण 'ओबीसी', भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

30 एप्रिल : त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनंतर आता गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी हे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्रिवेदींनी पंतप्रधान मोदी आणि बाबासाहेब आंबेडकरांना 'ब्राह्मण' म्हटलं आहे तर त्यांनी श्री कृष्णांला 'ओबीसी' म्हणून संबोधलं आहे. पण यावर आक्रमक प्रतिक्रिया आल्याने त्यांनी News18 शी बोलताना आपल्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनासाठी भगवद गीतेचं उदाहरण दिलं आहे.

ते म्हणाले की, 'जात माणसाच्या कृत्याने ठरते, जन्माने नाही. गीतेच्या अनुसार, एखादा व्यक्ती त्याच्या कर्माने ब्राह्मण ठरतो. एक ज्ञानी व्यक्तीच ब्राम्हण असू शकतो.' त्यांच्या या विधानावर अनेक स्तरातून वादग्रस्त प्रतिक्रिया उमटतायत.

दरम्यान, उत्तर-पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार उदित राज यांनाही त्रिवेदी यांचं वक्तव्य खटकलं. त्यांनी यावर जोरदार टीका केली. 'राजेंद्र त्रिवेदी यांचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे. त्रिवेदींच्या या वक्तव्यातून पक्षाला किती नुकसान होईल याचं त्यांना भान नाही आहे.' असं ते म्हणाले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 01:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close