मराठी बातम्या /बातम्या /देश /

बाईक-रिक्षा-कारचा विचित्र अपघात, 6 जणांनी गमावला जीव

बाईक-रिक्षा-कारचा विचित्र अपघात, 6 जणांनी गमावला जीव

दोन विचित्र अपघाताने देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक अपघात ज्यामध्ये तीन वाहनांची विचित्र धडक झाली.

दोन विचित्र अपघाताने देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक अपघात ज्यामध्ये तीन वाहनांची विचित्र धडक झाली.

दोन विचित्र अपघाताने देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक अपघात ज्यामध्ये तीन वाहनांची विचित्र धडक झाली.

    अहमदाबाद : दोन विचित्र अपघाताने देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक अपघात ज्यामध्ये तीन वाहनांची विचित्र धडक झाली. तर दुसरा अपघात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला आहे. काळ कधी कसा आणि कुठे गाठेल याचा नेम नाही. या अपघातात 6 लोकांनी जीव गमवला आहे. पहिला अपघात उत्तर प्रदेशातील उन्नाव इथे लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर झाला. पावसामुळे रस्ता बुळबुळीत झाला होता. त्याचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे बस घसरली आणि नियंत्रण सुटलं. त्यामुळे भीषण अपघात झाला. यामध्ये 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसरा अपघात गुजरातमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये कार-बाईक आणि रिक्षाची एकमेकांना धडक झाली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार चालक हा आमदाराचा जावई आहे. आणंद इथल्या सोजित्रा इथे कारने रिक्षा आणि बाईकला धडक दिली. रिक्षामध्ये चार जण प्रवास करत होते. तर बाईकवरील दोन जणांचाही मृत्यू झाला आहे. दोन बहिणी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधायला मामाच्या घरी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत आई देखील होती. कार चालकाने रिक्षा आणि बाईकला धडक दिली. या अपघातानंतर कार चालक फरार झाला. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Accident, Gujarat, Uttar pardesh

    पुढील बातम्या