अहमदाबाद, 15 जून : गुजरातमध्ये मोठा अपघात झाला आहे. एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. बडोदा येथील फर्टीकुई गावातील ही दुर्दैवी घटना आहे. मृतांमध्ये हॉटेलच्या चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार, अजय वसावा (24 वर्ष), विजय चौहान (22 वर्ष), सहदेव वसावा (22 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. अन्य 4 जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतलं आहे. पण अद्याप मालकाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
Gujarat: Seven people including four sanitation workers cleaning a hotel's septic tank have died, allegedly of suffocation, in Fartikui village in Vadodara. Details awaited. pic.twitter.com/KjXvZsBC8n
दरम्यान, महाराष्ट्रातील ठाणे येथेही 9 जून रोजी अशीच घटना घडली होती. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टॅंकमध्ये एकूण आठ कामगार अडकले होते. यातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अन्य पाच जणांची प्रकृती खालावली होती. ढोकाळी परिसरातील ही घटना घडली होती. अमित पुहाल (वय 20 वर्ष), अमन बादल (वय 21 वर्ष) आणि अजय बुंबक (वय 24 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला होता.
Thane West: 8 people got stuck in a 130 cubic meter deep Sewage Treatment Plant at Pride Presidency Luxuria in Dhokali around 12:25 am today. 3 of them died in the incident, rest 5 were rescued. Bodies handed over to police. #Maharashtrapic.twitter.com/XqzFGKw3cb