गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना मोठा दिलासा, आयोगाकडून क्लीन चिट

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना मोठा दिलासा, आयोगाकडून क्लीन चिट

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन गुजरात सरकारला क्लीन चिट देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या गोध्रा दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन गुजरात सरकारला क्लीन चिट देण्यात आली आहे. गुजरात विधानसभेत नानावटी मेहता आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे. 'गोध्रा ट्रेन जळल्यानंतर झालेल्या दंगली या पूर्वनियोजित नव्हत्या,' असं नानावटी मेहता आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीत अनेक निरपराधांचा बळी गेला होता. या दंगीलवरूनच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना वारंवार टार्गेट करण्यात येतं. ही दंगल भडवण्यात तत्कालीन गुजरात सरकारचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आल्यानंतरही याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केलं होतं.

या सर्व पार्श्वभूमीवर अखेर 17 वर्षांनी चौकशी करणाऱ्या आयोगाने 2002 ची गुजरात दंगल पूर्वनियोजित नव्हती, असा अहवाल सादर केल्याने नरेंद्र मोदी यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून आता काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहावं लागेल.

काय आहे गुजरात दंगल प्रकरण?

27 फेब्रुवारी 2002 साली गोध्रा हत्याकांड झाले होते. साबरमती एक्स्प्रेसच्या 'एस-6' डब्याला 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती.

याप्रकरणी एसआयटी कोर्टाने 1 मार्च 2011 रोजी 31 जणांना दोषी ठरवण्यात आले होते तर 63 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. तसेच 11 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती.

या 11 दोषींना फाशीऐवजी जन्मठेप

1) बिलाल इस्माइल उर्फ हाजी बिलाल

2) अब्दुल रझाक कुरकरु

3) रामझानी बिनयामीन बेहरा

4) हसन अहमद चरखा

5) जाबीर बिनयामीन बहेरा

6) महेबूब चंदा

7) सलीम युसूफ जर्दा

8) सिराझ मोहम्मद मेडा

9) इरफान कलंदर

10) इरफान पातलिया

11) महेबूब हसन लतिको

Published by: Manoj Khandekar
First published: December 11, 2019, 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading