गुजरात राज्यसभा निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा, भाजप-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

काँग्रेस आणि भाजप पक्षांच्या दोन्ही मतांची वैधता तपासण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पोहचले आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2017 09:11 PM IST

गुजरात राज्यसभा निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा, भाजप-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

08 आॅगस्ट : गुजरात राज्यसभा निवडणुकीला आता वेगळंच वळण मिळालंय.  निवडणुकीचीही लढाई आता दिल्लीत पोहचली आहे. काँग्रेस आणि भाजप पक्षांच्या दोन्ही मतांची वैधता तपासण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पोहचले आहे. दोन्ही पक्षांच्या सदस्यीय मंडळांनी निवडणूक आयोगाची भेट घेतलीये.

राज्यसभा मतदानाच्या वेळी दोन आमदारांनी आपली मतं ही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना दाखवली असा आरोप काँग्रेसने केलाय. त्यामुळे ही मतं रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केलीये. तर निवडणूक आयोगाकडे अशी तक्रार करणेच चुकीचे आहे असा दावा भाजपने केलाय.

काँग्रेसने आपली बाजू मांडण्यासाठी राज्यसभा सदस्य आनंद शर्मा, पी चिंदबरम आणि प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाकडे पाठवलंय.

तर भाजपनेही आपल्या दिग्गज नेत्यांची फौजच मैदानात उतरवली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अरूण जेटली, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारमण यांचा समावेश आहे.

गुजरातचे काँग्रेसचे नेते अर्जुन मोढंवाडिया यांनी भाजपवर निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा आरोप केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 09:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...