गुजरात राज्यसभा निवडणूक; काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

गुजरात राज्यसभा निवडणूक; काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

Gujarat Rajya Sabha election : Supreme Courtनं काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून : गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. त्यावर होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत याचिका दाखल केली होती. पण, काँग्रेसनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील काँग्रेसचे नेता परेशभाई धनानी यांनी निवडणूक आयोगानं वेगवेगळ्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला त्याविरोधात याचिका दाखल केली होती. पण, त्यावर सुनावणीस आता सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. 5 जुलै रोजी या निवडणुका पार पडणार आहेत. अमित शहा आणि स्मृती इराणी लोकसभेत गेल्यानं या निवडणुका होणार आहेत.

राज्यसभेसह दोन्ही सभागृहांमधील रिक्त जागांवर निवडणुका होणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अधिसुचना काढल्या जाणार असून निवडणुका देखील वेगवेगळ्या होणार आहेत. गुजरातमधील अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्या जागा या रिक्त झालेल्या आहेत.

आणीबाणीची 44 वर्षे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ

काय आहे काँग्रेसचा दावा

गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागांवर होणाऱ्या निवडणुका या असंविधानिक असल्याचा आरोप काँग्रेसनं करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या याचिकेमध्ये काँग्रेसनं निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे.

अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला. त्यामुळे राज्यसभेच्या दोन्ही जागा या रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागांवर एकत्र निवडणुका झाल्यास एक जागा काँग्रेसला मिळू शकते. पण, निवडणूक आयोगानं वेगवेगळ्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्याविरोधात काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 12:26 PM IST

ताज्या बातम्या