पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 69वा वाढदिवस, असा आहे त्यांचा संपूर्ण दिवसाचा प्लान

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 69वा वाढदिवस, असा आहे त्यांचा संपूर्ण दिवसाचा प्लान

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69वा वाढदिवस आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69वा वाढदिवस आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. येथील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाची ते पाहणी करणार आहेत. यानंतर केवाडियातील एका कार्यक्रमाला ते संबोधितही करणार आहेत. शिवाय, मातोश्री हीराबाई यांचा आशीर्वादही घेतील.

असा आहे पंतप्रधान मोदींचा दिवसभराचा कार्यक्रम

पंतप्रधान मोदी आईची भेट घेणार

पंतप्रधान मोदी सर्वात आधी आपली आई हीराबेन यांची भेट घेतील. आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते थेट केवाडियामध्ये दाखल होतील. नर्मदा जिल्ह्यात होणाऱ्या पूजेमध्ये ते सहभागी होतील. येथील एका जनसभेला मोदी संबोधितही करणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेदरम्यान ही सभा होण्याची शक्यता आहे.

(वाचा : स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? - उद्धव ठाकरे)

सरदार सरोवर धरणावर तिरंग्याची रोषणाई

पंतप्रधान मोदींच्या नर्मदा जिल्ह्याच्या दौऱ्यावरपूर्वी सरदार सरोवर धरणावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली. मोदींनी 17 डिसेंबर 2017मध्ये या धरणाचं उद्घाटन केलं होतं. सध्या या धरणाची पाणीपातळी 138.68 मीटर एवढी आहे. मोदींच्या दौऱ्यासंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. '17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केवाडियामध्ये होणाऱ्या 'नमामि देवी नर्मदा महोत्सव' त्यांच्या स्वागतासाठी पूर्णतः तयार आहे.'

(वाचा : नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का, 'या' मतदारसंघातून शिवसेना लढणार विधानसभा!)

याव्यतिरिक्त भाजपकडूनही मोदींच्या जन्मदिनानिमित्त जंगी तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह भाजपचा प्रत्येक सदस्य सहभागी होणार आहे. यादरम्यान स्वच्छता अभियानदेखील चालवलं जाणार आहे आणि गरजूंच्या मदतीसाठी रक्तदान कार्यक्रम देखील राबवला जाणार आहे.

(वाचा :साताऱ्यात पहिल्यांदाच भाजपचा भगवा फडकणार? राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार)

दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपल्या समर्थकांसह पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस इंडिया गेटवर साजरा केला. यावेळेस त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते हजर होते. इंडिया गेटवर एक स्पेशल केक कापण्यात आला. केकवर कलम 35 अ आणि कलम 370 रद्द केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात आल्या.

CCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 07:33 AM IST

ताज्या बातम्या