मराठी बातम्या /बातम्या /देश /

रेस्क्यू करताना हात सुटला आणि घात झाला, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

रेस्क्यू करताना हात सुटला आणि घात झाला, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

    सुरेंद्रनगर, 01 सप्टेंबर: नर्मदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. इतकच नाही तर अनेक ठिकाणी इमारत कोसळण्याच्या आणि गाड्या वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुरेंद्रनगर इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना दोरीच्या मदतीनं वाचवण्याचं काम सुरू असताना दोन तरुणांचा हात सुटला आणि मोठी दुर्घटना घडली. त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलं आहे तर दुसरा तरुण पाण्यात वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. स्थानिकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-...आणि पुराच्या पाण्यात पत्त्यांसारखी कोसळली इमारत, पाहा दुर्घटनेचा LIVE VIDEO नर्मदा नदीनं रौद्र रुप धारण केल्यामुळे अनेक ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य गुजरातमधील भरूज जिल्ह्यात नर्मदेजवळ प्राचिन मंदिराचा भाग असलेली इमारत पुराच्या पाण्यात पत्त्यासारखी कोसळली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील विदर्भात मुसळधार पाऊस आणि धरणांमधून पाणी सोडल्यानं गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोलीचा नागपूरसोबत संपर्क देखील तुटला आहे. अनेक गावांमधील महत्वाचे 10 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या