Home /News /national /

दिल है की मानता नही! मुलीच्या होणाऱ्या सासऱ्याबरोबर दुसऱ्यांदा पळून गेली आई

दिल है की मानता नही! मुलीच्या होणाऱ्या सासऱ्याबरोबर दुसऱ्यांदा पळून गेली आई

प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणतात. पण काही प्रेमीयुगुलांच्या अशा काही घटना समोर येतात, की आश्चर्याचा धक्काच बसतो. ज्या मुलाबरोबर आपल्या मुलीचं लग्न ठरलं त्याच मुलाच्या वडिलांबरोबर एक महिला एकदा नव्हे तर दोन वेळा पळून गेली आहे.

पुढे वाचा ...
    नवसारी, 2 मार्च : प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणतात. पण काही प्रेमीयुगुलांच्या अशा काही घटना समोर येतात, की आश्चर्याचा धक्काच बसतो. ज्या मुलाबरोबर आपल्या मुलीचं लग्न ठरलं त्याच मुलाच्या वडिलांबरोबर एक महिला दुसऱ्यांदा पळून गेली आहे. एक महिला आपल्या मुलीच्या लग्नाआधीच तिच्याच सासऱ्यांबरोबर पळून गेली होती. मात्र ते दोघेही काही दिवसांपूर्वी परत आले होते. आता पुन्हा एकदा ते पळून गेल्याने दोघांच्याही कुटुंबीयांनी डोक्याला हात मारून घेतला आहे. ही घटना आहेत गुजरातमधील नवसारी याठिकाणची. सूरत येथील 43 वर्षीय हिम्मत पटेल आणि नवसारीची 42 वर्षीय शोभना रावल पहिल्यांदा 10 जानेवारीला बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी परत आल्यानंतर ते पुन्हा एकदा 29 फेब्रुवारीला पसार झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ते सूरत याठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. मात्र यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात खबर दिली नाही आहे. आई-वडिलांच्या पळून जाण्याने मुलामुलींचं लग्न मोडलं होतं. हिम्मत पटेल आणि शोभना रावल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. 10 जानेवारीला बेपत्ता झाल्यानंतर पटेल आणि रावल अनुक्रमे 26 जानेवारीला सुरत आणि नवसारी पोलिसांसमोर हजर झाले. यावेळी दोघे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे वास्तव्यास होते. नवसारीचे पोलिस अधीक्षक गिरीश पंड्या यांनी रावल यांच्या पतीने शोभना यांना परत घेण्यास नकार दिला आहे. (हे वाचा-जन्मदात्या आईनेच पोटच्या चिमुरड्याला बुडवलं पाण्याच्या टाकीत, नंतर रचलं कुभांड!) मिळालेल्या माहितीनुसार वधू-वर आपल्या लग्नाची तयारी करत होते. एका वर्षापूर्वी दोघांचा साखरपूडा झाला होता. दोघेही एकाच समाजातील असून कुटुंबीयांनीही या नात्याला सहमती दर्शविली. मात्र लग्नाच्या जवळपास महिनाभरापूर्वीच दोन्ही पालकांचे बेपत्ता झाल्याच्या घटनेने लोकांना हैराण केले आहे. मुलाचे वडील राकेश (नाव बदलले आहे) कापड आणि जमीन या व्यवसायात आहेत. 10 जानेवारीपासून बेपत्ता राकेश हा एका राजकीय पक्षाचा सदस्यही आहे. त्याला वधूची आई स्वाती (नाव बदललेले) यांना आधीपासून ओळख होते. दोघेही कटारगाम परिसरातील शेजारी आणि चांगले मित्र होते. या दोन कुटुंबातील एका नातेवाईकाने सांगितले की ते दोघे एकाच समाजात वास्तव्यापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या काही निकटवर्तीयांनी आम्हाला सांगितले की यापूर्वीही दोघांचे संबंध होते. शोभनाने मात्र, नवसारी येथील एका व्यक्तीशी लग्न केलं. शोभनाचे कुटुंब मूळचे भावनगर जिल्ह्यातील आहे. शोभना हिरे कारागाराशी लग्न केलं होतं ज्याने नंतर दलाल म्हणून काम करण्यास सुरवात केली.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या