गुजरात लोकसभा : मतदान वाढवणारी गुजराती जनता यंदा मोदींना 'हात' देणार की दाखवणार?

गुजरात लोकसभा : मतदान वाढवणारी गुजराती जनता यंदा मोदींना 'हात' देणार की दाखवणार?

गुजराती जनतेने 2019 मध्ये मोदींना शत प्रतिशत यश दिलं होतं. यंदा मोदींच्या राज्यात विक्रमी मतदान झालं आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्याचा फायदा काँग्रेसला होणार की सत्ताधारी भाजपला?

  • Share this:

अहमदाबाद, 10 मे  : लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपला गुजरातमधल्या सर्वच्या सर्व 26 जागा मिळाल्या. मोदी लाटेची सुरुवात याच राज्यातून झाली होती. आता 2019 मध्ये मोदींचं हे राज्य त्यांना किती 'हात' देतं हे लवकरच स्पष्ट होईल. गुजरातमध्ये राज्याच्या स्थापनेपासूनचं सर्वाधिक मतदान यंदा झालं आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्याचा फायदा काँग्रेसला होणार की सत्ताधारी भाजपला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

गुजरातमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत 64.11% इतकं मतदान झालं. हे मतदान आतापर्यंतचं सर्वाधिक आहे. पण दोन्ही प्रमुख पक्षांनी याचा फायदा आपल्याला होईल असा दावा केला आहे. मोदींची लोकप्रियता वाढली असून त्यामुळेच मोदींना निवडून देण्यासाठी गुजराती बांधव मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी उतरले, असं म्हणत भाजपने विजयाचा दावा केला. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. त्यामुळे सत्तेविरोधात मतदान करायला जनता उतरली, असं काँग्रेसनं सांगत मोदी लाट ओसरली असल्याचा दावा केला.

राजस्थान लोकसभा : भाजपला पैकीच्या पैकी गुण देणाऱ्या या राज्यात पारडं फिरणार का?

लोकसभा निवडणूक : पार्थ पवार VS श्रीरंग बारणे, मावळची लढत कोण जिंकणार?

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने शत प्रतिशत भाजपचा दावा खरा करून दाखवला होता. 2009 मध्ये गुजरात विधानसभेत सत्तेवर असताना मोदी मुख्यमंत्री होती. त्या वेळी भाजपला 26पैकी 15 जागा जिंकता आल्या होत्या. 11 जागा काँग्रेसकडे होत्या. त्या अगोदर 2004 च्या निवडणुकीत 14 जागा भाजपकडे होत्या. 12 जागा काँग्रेसकडे होत्या.

मतदारांची संख्या

एकूण मतदार 4,47,69,985

पुरुष मतदार 2,32,80,542

महिला मतदार 2,14,88,390

अन्य 1,053

उत्तर गुजरात, सौराष्ट्र, मध्य गुजरात, दक्षिण गुजरात असे सर्वसाधारण प्रभाग असणाऱ्या या राज्यात सर्वच भागात मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे आता जनतेचा फैसला कुणाच्या बाजूने आहे. गांधीनगरमधून अमित शहांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे या जागेकडे सर्वांचं लक्ष आहे. शिवाय सुरत, वलसाड, कच्छ या मतदारसंघांच्या लढतींकडेही लक्ष आहे.

First published: May 10, 2019, 6:00 PM IST

ताज्या बातम्या