अहमदाबाद, 13 डिसेंबर : सोशल मीडियावर सिंह आणि वाघांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्यांना जवळून पाहण्याचा योग फार कमी येत असतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिहांचा पाठलाग करणं दोन युवकांना चांगलंच महागात पडलं आहे.
सिंह दिसणं तसं फार दुर्मीळ. रस्त्यावरून रात्री उशिरा जात असताना सिंह दिसला आणि पाठलाग करण्याचा मोह आवरला नाही. हॉर्न वाजवून दोन तरुणांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग करायला सुरुवात केली. सिंहांनी या तरुणांना थेट तुरुंगात पाठवल्याची घटना समोर आली आहे. जंगलातील रस्त्यांवरून सिंहांचा पाठलाग करणाऱ्या दोन युवकांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर या दोन युवकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Gujarat: Two persons including a minor held after a video went viral showing bikers chasing a lion near Gir forest in Junagarh district. "They have been booked under provisions of Wildlife Protection Act," says Junagarh Chief Conservator of Forests Dushyant Vasavada. (11.12) pic.twitter.com/oqZvvDndKA
— ANI (@ANI) December 11, 2020
हे वाचा-ज्या मालकावर प्रेम केलं त्यानंच दिला धोका, गाडीला बांधून श्वाला 2 किमी फरफटत नेल
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुख्य संवर्धन अधिकारी डी.टी. वासवडा यांनी शनिवारी सांगितले की पाठलाग करणाऱ्या दोन्ही सिंहांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या मते जुनागडमधील गिर जंगलाजवळ ही घटना घडली. अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. दोघांनाही वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पकडण्यात आले आहेत.
त्यावेळी दोघेही दोन एशियाटिक सिंहांचा पाठलाग करत असल्याची माहिती पुढे आली आहे. पाठलाग करताना ते वेगवेगळे आवाज करीत होते. यामुळे सिंह घाबरले आणि पळून जाऊ लागले.