वरातीला निघालेल्या वऱ्हाडी टेम्पोला ट्रकची समोरासमोर धडक, 11 जण जागीच ठार

वरातीला निघालेल्या वऱ्हाडी टेम्पोला ट्रकची समोरासमोर धडक, 11 जण जागीच ठार

टेम्पोमधून वऱ्हाडी हे वरातीसाठी निघाले होते. लग्नाच्या वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो पादरा तहसील परिसरातील रानू आणि महुवाड दरम्यान पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली.

  • Share this:

बडोदा, 23 फेब्रुवारी :  गुजरातमधील बडोदा (Vadodara) जिल्ह्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. इथल्या रानू आणि महुवाडला (Mahuwad) जोडणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात (Road accident) झाला आहे. ट्रक आणि टेम्पो दरम्यान जोरदार टक्कर झाल्याचं बोललं जात आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर अनेक लोक जखमी असल्याचंही सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोमधून वऱ्हाडी हे वरातीसाठी निघाले होते. लग्नाच्या वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो पादरा तहसील परिसरातील रानू आणि महुवाड दरम्यान पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही टक्कर इतकी गंभीर होती की, टेम्पोचा पूर्ण चुरडा झाला आहे. घटनेनंतर जवळपासचे लोक घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांना अपघाताची माहिती देताच बचावरकार्य सुरू झालं.

इतर बातम्या - अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा सेनेगलमध्ये अटक, आज आणणार भारतात

माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहोचले. टेम्पोमध्ये अडकलेल्या लोकांना त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी 11 जणांना मृत घोषित केलं. जखमींना प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी बडोदाला उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला दिला. सर्व जखमींवर बडोदा येथील सर सयाजी जनरल (एसएसजी) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 07:12 AM IST

ताज्या बातम्या