भयंकर! इथे फटाके उडवत नाहीत तर एकमेकांच्या अंगावर फेकले जातात, पाहा VIDEO

भयंकर! इथे फटाके उडवत नाहीत तर एकमेकांच्या अंगावर फेकले जातात, पाहा VIDEO

जीव धोक्यात घालून एकमेकांवर या ठिकाणी फटाके फेकले जातात. गुजरातच्या अमरेली भागातील सावरकुंडला भागात हा भयंकर खेळ लक्ष्मीपूजनादिवशी खेळला जातो.

  • Share this:

अमरेली, 15 नोव्हेंबर : दिवाळी आणि फटाके एक समीकरणच आहे. फटाके उडवले नाही तर दिवाळी साजरी केल्यासारखं अनेकांना वाटत नाही पण हे फटाके जमिनीवर नाही तर एकमेकांच्या अंगावर फोडण्याची अजब परंपरा एका गावात चालते. कोरोना काळात अनेक ठिकाणी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या गावात कोरोना असो वा आणखीन काही हा खेळ खेळण्याची परंपरा कधी मोडली गेल्याचं ऐकायला मिळालं नाही. यंदा देखील कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवून जीवघेणा फटाक्यांचा खेळ करण्यात आला.

दारूगोळ्यानं भरलेले फटाके एकदुसऱ्यावर फेकण्याची पद्धत आहे. गेल्या 100 वर्षांपासून ही प्रथा या गावात सुरू आहे. जीव धोक्यात घालून एकमेकांवर या ठिकाणी फटाके फेकले जातात. गुजरातच्या अमरेली भागातील सावरकुंडला भागात हा भयंकर खेळ लक्ष्मीपूजनादिवशी खेळला जातो.

हे वाचा-कसलं भारी! 9 वर्षांच्या लहान भावाला वाचवण्यासाठी मोठा भाऊ भिडला बिबट्याशी

इंगोरिया झाडाची फळ काढून ती सुकवून त्यामध्ये दाळूगोळा भरून त्याचे फटाके तयार केले जातात आणि ते एकमेकांवर फेकले जातात. हे फटाके फेकल्यानंतर खूप लांबपर्यंत जातात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलिसांचा ज्यादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय यंदा या खेळावर कोरोनाचं सावट देखील दिसलं आहे. लोक रस्त्यावर खेळण्यासाठी उतरले असले तरी ही संख्या कमी आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 15, 2020, 3:59 PM IST

ताज्या बातम्या